महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य - आरोग्य विषयक समस्यांकडे लक्ष

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 1:03 AM IST

मेष :ह्या आठवड्याची सुरवात काहीशी संथ गतीने होईल. आपणास आपल्या आरोग्य विषयक समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा आपणास त्रास होऊ शकतो. आपल्या विरुद्ध एखादा खटला चालू असल्यास ह्या आठवड्यात आपल्या बाजूने निकाल लागून आपला फायदा होण्याची शक्यता सुद्धा आहे. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या अनुकूल आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. किरकोळ खर्च सुद्धा होतील. शासकीय - प्रशासकीय लोकांशी आपली भागीदारी होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा अनुकूल आहे. आपली स्थिती उत्तम असेल. आपल्या कामगिरीमुळे आपली प्रशंसा होईल. व्यापारात किरकोळ चढ - उतार आले तरी सुद्धा व्यापार उत्तम झाल्याने व्यापाऱ्यांना हा आठवडा चांगला जाईल. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होऊन परस्पर संबंधात सुधारणा होत असल्याचे दिसून येईल. प्रेमीजन आपले प्रणयी जीवन सुखद करण्याचा प्रयत्न करतील. ते आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधण्यात यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना हा आठवडा अनुकूल आहे. ते आपल्या अध्ययनावर लक्ष एकाग्र करू शकतील. त्यांची ग्रहण क्षमता वाढेल व त्याचा त्यांना लाभ होईल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. आठवड्याच्या सुरवातीस विनाकारण आपल्या खर्चात वाढ झाल्याने आपण त्रस्त व्हाल. आपली इच्छा नसताना सुद्धा हे खर्च आपणास करावे लागल्याने आपल्या खिशावर ताण येऊ शकतो. आपली प्रकृती बिघडण्याची संभावना असून आपण आजारी पडण्याची शक्यता असल्याने आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कामे होता होता खोळंबा होऊ शकतो. तेव्हा आपल्या कुटुंबातील वयोवृद्धांचे आशीर्वाद घ्यावेत. नोकरीत धावपळ वाढेल. आपली कामे पूर्ण करण्यास आपल्याला वेळ लागेल. हा आठवडा व्यापारासाठी उत्तम आहे. आपल्या अपेक्षेहून जास्त फायदा मिळविण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात समाधान लाभेल. त्यांच्या जोडीदाराने एखादे मोठे लक्ष्य साध्य केल्यामुळे ते स्वतः खुश होतील तसेच कुटुंबीय सुद्धा खुश होतील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपली प्रेमिका आपल्या पासून दुरावली जाऊ नये म्हणून त्यांना विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी आव्हानांनी भरलेला आहे. त्यांचे एकाग्रचित्त होण्यात अडचणी आल्याने त्यांच्या अभ्यासात कमतरता येईल. आठवड्याचे मधले दिवस व अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.

मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या प्राप्तीच्या बाबतीत काहीसे चिंतीत असाल. येणारा पैसा अडकू शकतो, थोडा धीर धरा. प्रकृतीत चढ - उतार होताना दिसेल. पोट दुखी होण्याची संभावना आहे. ताप सुद्धा येऊ शकतो किंवा बद्धकोष्ठता सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आपण त्रासून जाल. आहारावर योग्य नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकतो. वाद संभवतात. वैवाहिक जोडीदाराशी संबंध ठीक राहतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी वाढतील. विरोधक डोके वर काढतील. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. शासनाकडून काही लाभ संभवतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सामान्यच आहे. त्यांना एकाग्रता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कर्क : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आपण काहीतरी नवीन काम करून प्रसिद्धी मिळवाल. त्यामुळे आपली पदोन्नती होण्याची संभावना आहे. आपली पगारवाढ होऊ शकते. असे झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपण जर व्यापार करत असाल तर पूर्वीच्या कामांमुळे आपणास मदत होण्याची संभावना आहे. व्यापारात आपणास आपल्या मित्रांचे सुद्धा सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा चांगला आहे. आपले परिश्रम यशस्वी होतील. आपल्या सासुरवाडी कडील मंडळी सुद्धा आपले वैवाहिक जीवन सुखद करण्यात आपणास पूर्ण सहकार्य करतील. त्याच बरोबर आपल्या कुटुंबियांची मानसिकता सुद्धा सहकार्य करण्याचीच राहील. प्रणयी जीवनासाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेस अचानकपणे बाहेर फिरावयास घेऊन जाऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. अभ्यासात काही अडथळा येऊ शकतो. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

सिंह : ऑक्टोबर महिन्याचा हा पहिला आठवडा आपणास अनुकूल आहे. आपण एखाद्या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात असू शकता. कदाचित आपल्या वडिलांची प्रकृती बिघडण्याच्या संभावनेमुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी सुद्धा आपणास घ्यावी लागेल. आपल्या मान - सन्मानात वाढ होत असल्याचे बघून आपला आत्मविश्वास उंचावेल व आपल्या आरोग्यात सुधारणा होईल. नोकरीत धावपळ होईल. त्याच बरोबर आपणास आपली वागणुक नियंत्रित ठेवावी लागेल. काही लोकांशी आपला वाद संभवतो. ह्या व्यक्ती आपल्या वरिष्ठांच्या जवळच्या असतील, तेव्हा सावध राहावे. हा आठवडा वैवाहिक जीवनासाठी अनुकूल आहे. आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर झाल्याने आपण खुश व्हाल. घरात सकारात्मक वातावरण राहील. आपणास नशिबाची साथ मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. आपली बँकेतील शिल्लक वाढेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी अनुकूल आहे. आपल्या मनातील भावना बोलून दाखविल्याचा फायदा होत असल्याचे सुद्धा आपणास दिसून येईल. प्राप्तीच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल असल्याचा फायदा उचलून घ्यावा. जे विद्यार्थी इन्फॉर्मशन टेक्नोलोजीचा अभ्यास करत आहेत त्यांना उत्तम यश प्राप्त होईल. इतर विद्यार्थ्यांना मेहनत थोडी वाढवावी लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कन्या : ह्या आठवड्याच्या सुरवातीस आपणास त्रास होऊ शकतो. आरोग्याशी संबंधित त्रास व आर्थिक समस्या अशा दोन्ही गोष्टी आपणास पीडा देऊ शकतात. तेव्हा आपणास स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आवश्यकता भासल्यास आपल्या जवळच्या व्यक्ती समोर आपले मन मोकळे करून ह्या त्रासातून बाहेर पडावे लागेल. थोडी ध्यान - धारणा सुद्धा करावी कि ज्यामुळे मानसिक ताण कमी होऊ शकेल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल राहील. आपले परिश्रम हेच आपले शस्त्र ठरेल. आपण जे काही प्रयत्न केले आहेत त्याने आपल्या कामात सुधारणा होईल. व्यापारात काही नवीन सौदे आपली वाट बघत असतील. आपणास फक्त डोके शांत ठेवून काम करावे लागेल. विवाहित व्यक्तीने वैवाहिक जीवनातील तणाव वाढू न देण्याची खबरदारी घ्यावी, अन्यथा त्रास वाढू शकतो. आपण क्रोधीत होऊन जोडीदारास अपमानित कराल व त्यामुळे नात्यात कटुतेचा सामना करावा लागू शकतो. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा पूर्णतः अनुकूल आहे. आपण प्रेमिकेशी प्रेमालाप करू शकाल. परस्पर संबंधात वृद्धी होईल. आठवड्याच्या सुरवातीस आरोग्य विषयक त्रास होण्याची संभावना असल्याने प्रवास टाळावा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सर्जनशीलतेची संधी निर्माण करणारा आहे. ते त्यांचा एखादा छंद जोपासू शकतील. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावेल.

तूळ :हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल व उन्नतीदायक असला तरी ह्या दरम्यान आपणास अनिच्छनीय परिणाम सुद्धा मिळतील. आपणास अपेक्षित नसलेले लाभ मिळण्याची संभावना सुद्धा आहे. हा आठवडा अचानकपणे आपली व्यावसायिक भरभराट करेल, परंतु कोणतेही बेकायदा काम करू नये. अन्यथा आपणास त्रास होऊ शकतो. खर्चात वाढ होईल. आपली प्रकृती सुद्धा बिघडू शकते. आपला ताप किंवा पित्त प्रकोप वाढू शकतो. प्राप्तीत वाढ होईल. कार्यक्षेत्री पदोन्नती संभवते. आपली पगारवाढ संभवते. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात चढ - उतार येत असल्याचे जाणवेल. आपले वैवाहिक जीवन चांगले असले तरी जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची संभावना आपणास त्रस्त करेल. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेस विवाहाची मागणी घालू शकाल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबींवर आपण लक्ष केंद्रित कराल. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकूल आहे. त्या नंतर आठवड्याचा चौथा व पाचवा दिवस सुद्धा प्रवासास अनुकूल राहील. विद्यार्थी अभ्यासातील अडथळ्यांमुळे नवीन काहीतरी शिकतील.

वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी सामान्यतः अनुकूल राहिला तरी आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल. आठवड्याच्या सुरवातीस मानसिक चिंता आपणास त्रस्त करतील व त्यामुळे आपली प्रकृती बिघडू शकते. तेव्हा थोडी काळजी घ्यावी. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत यश प्राप्ती होईल. आपण एखादी संपत्ती मिळवू शकाल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या पाठीशी उभे राहतील. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांच्या योजना यशस्वी झाल्याचा त्यांना लाभ होईल. ह्या आठवड्यात विवाहितांचे वैवाहिक जीवन सुद्धा सुखद होईल. घरगुती वातावरण सुखावह होईल. प्रेमीजनांसाठी मात्र आठवडा चढ - उतारांचा आहे. त्यांना क्रोधास सामोरे जावे लागेल. आपली प्रेमिका सुद्धा तिच्यावर कौटुंबिक बाबींचा ताण असल्याने काहीशी त्रासलेली असेल. असे असून हि आपले नाते टिकून राहील. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागेल.

धनु: हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. आपण आपल्या संततीवर असलेले प्रेम दर्शवाल व त्यासाठी काहीसे चिंतातुर व्हाल. मात्र असे काही करण्याची गरज नाही. ते त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करतील. आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या प्रेमिकेस विवाहाची मागणी घालण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आपणास त्याचे सकारात्मक परिणाम मिळण्याची दाट शक्यता आहे. मित्रांसह मौज मजा करण्याची संधी मिळेल. एखादे धार्मिक पुस्तक किंवा एखादी मूर्ती खरेदी करून घरी आणू शकता. मूर्तीची पूजा सुरु करू शकता. आरोग्य उत्तम राहील. जास्त मसालेदार पदार्थ मात्र टाळावे. नोकरी करणाऱ्यांची पत वाढून नोकरीतील स्थिती मजबूत होईल. आपल्या बाजूने निकाल लागेल. व्यापारासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्याचा सदुपयोग करून विद्यार्थी आपल्या कामगिरीत सुधारणा करू शकतील. आठवड्याचा पहिला दिवसच प्रवासास अनुकूल आहे.

मकर: हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास कुटुंबियांचे सहकार्य व समर्थन मिळाल्याने आपली कामे यशाच्या मार्गावर प्रगती करतील. नोकरी करणाऱ्यांना आपली कामे लक्षपूर्वक करावी लागतील. कामात लक्ष न लागल्यास त्रास होण्याची संभावना आहे. व्यापारात आपली बुद्धी तेज गतीने कार्य करेल व त्याचा आपणास लाभ होईल. व्यापारी वृत्तीमुळे आपण उत्तम धनार्जन करू शकाल. वैवाहिक जीवनात गोड बोलण्याने व प्रेमाने आपण आपल्या जोडीदाराच्या हृदयात आपले स्थान अधिक दृढ करू शकाल. असे झाल्याने आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रणयी जीवनाचा आनंद आपण उपभोगू शकाल. प्रेमिकेच्या सहवासात बराचसा वेळ घालवू शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. ते आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून खूप मेहनत सुद्धा करतील.

कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण खूपच व्यस्त राहाल. मित्रांच्या सहवासात वेळ घालवाल. एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. असे झाल्याने आपणास नवीन तजेला मिळेल. आरोग्याकडे थोडे लक्ष मात्र द्यावे लागेल. विशेषतः मसालेदार पदार्थ खाणे टाळावे लागेल तसेच वाहन सुद्धा जपून चालवावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाचे चांगले परिणाम मिळाले तरी आपल्या सहकार्यां बरोबर संबंधात कटुता येऊ शकते. ह्याकडे लक्ष द्यावे, अन्यथा त्याचा प्रभाव आपल्या कामावर होऊ शकतो. व्यापाराच्या दृष्टिकोनातून आठवडा चांगला आहे. सरकारी क्षेत्राकडून असलेला तणाव वाढू शकतो तेव्हा सावध राहावे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. आपल्यातील जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना त्यांनी आजवर दुर्लक्षिलेल्या विषयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आठवड्याच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीन : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या गोष्टीमुळे चिंतीत असण्याची संभावना आहे. मात्र, अशी चिंता करून काहीच निष्पन्न होणार नाही. तेव्हा अशा चिंतां पासून दूर राहा व आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. असे केल्याने आपल्या आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक तणावा पासून मुक्ती मिळाल्याने आपली कामे सुरळीत होतील. आपणास नशिबाची साथ मिळाल्याने नोकरीत किंवा व्यापारात आपण उत्तम कामगिरी करून आपली प्रतिमा उंचावू शकाल. ह्या आठवड्यात व्यापारात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. शासनाकडून सुद्धा चांगला लाभ होण्याची संभावना आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काहीसा तणाव असल्याचे दिसून येईल. अशा स्थितीत जोडीदाराची मनःस्थिती बघून संवाद साधणे उचित ठरेल. प्रेमीजनांना त्यांचे प्रणयी जीवन सुखद असल्याचे जाणवेल. आपली प्रेमिका आपले हृदय जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. विद्यार्थ्यांना हा आठवडा अनुकूल आहे. त्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. त्यांना नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा होऊन ते अभ्यासात पुढील वाटचाल करतील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

हेही वाचा :

  1. Today Horoscope : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा राशीभविष्य
  2. Today Love Horoscope : 'या' राशीच्या लव्ह बडर्ससाठी असेल आजचा दिवस खास; वाचा लव्हराशी
  3. Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग

ABOUT THE AUTHOR

...view details