नवी दिल्ली : सध्या नागरिकांना हिट स्ट्रोकचा चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे देशाच्या बहुतांश भागांमध्ये एप्रिल आणि मेमध्ये तीव्र उन्हाचा फटका बसू शकतो. मात्र मार्चमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता कमी असल्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. मात्र या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात प्रचंड तापमान वाढले होते. या वाढलेल्या तापमानाने 1877 नंतर भारतातील सर्वात उष्णतेचा विक्रम या फेब्रुवारी महिन्यात नोंदवला गेल्याची माहितीही हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. या महिन्यात सरासरी कमाल तापमान 29.54 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे हे तापमान वाढल्याची माहिती हवामान खात्याने मंगळवारी दिली आहे.
मार्चमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता कमी :सध्या देशाच्या सगळ्याच भागात प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे उन्हाळा प्रचंड तापदायक जाणार असल्याची शक्यता नागरिक वर्तवत आहेत. मात्र हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी मार्च महिन्यात उस्णतेची लाट येणार नसल्याची माहिती दिली आहे. याबाबत आयएमडीच्या हायड्रोमेट आणि अॅग्रोमेट अॅडव्हायझरी सर्व्हिसेसचे प्रमुख एस सी भान यांनी माहिती दिली आहे. एस सी भान यांनी ऑनलाईन प६कार परिषद घेत मार्चमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता कमी असल्याची माहिती दिली. मात्र परंतु एप्रिल आणि मेमध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये कडक उन्हाचा फटका बसण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राच्या काही भागात राहील साधारण तापमान :मंगळवारी हवामान विभागाने पत्रकार परिषद घेऊन देशातील हवामानाची माहिती दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील काही भागात कडक उन्हाचा फटका बसणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यात दक्षिण भागाचा समावेश असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात प्रचंड तापमान असते. याबाबतची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली नसल्याचे या पत्रकार परिषदेतून दिसून आले. त्यातही विदर्भातील अकोला, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्याचे तापमान प्रचंड असते, याबाबतही हवामान विभागाने कोणतेही भाष्य केले नाही.