महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Weather Forecast Today: दिल्लीसह अनेक राज्यांत पावसाचा हाहाकार, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची प्रतिक्षा - Mumbai rains

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून वारे सक्रिय झाल्यामुळे, दिल्लीसह वायव्य भारतात मुसळधार पाऊस झाला आहे. उत्तर आणि पश्चिम भारतात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले आहे. हिमाचल प्रदेशसह डोंगराळ भागातील राज्यांचे मोठे नुकसान केले आहे. यमुना नदीच्या प्रवाहामुळे राजधानी दिल्लीत पूर येण्याची भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात मराठवाड्याला अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. तर कोकणात आजही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Weather Forecast Today
भारतीय हवामान विभाग अंदाज

By

Published : Jul 10, 2023, 8:14 AM IST

Updated : Jul 10, 2023, 8:32 AM IST

मुंबई/नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांसह अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. विविध घटनात 18 जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे महाराष्ट्रात सरासरीहून कमी पावसाची नोंद झाल्याचे दिसत आहे. दिल्लीतील यमुनेसह देशाच्या उत्तरेकडील अनेक नद्यांना पूर येण्याची स्थिती आहे. त्यामुळे दिल्लीवर पुराचे संकट घोंगावत आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शहरांमध्ये जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक शहरातील वाहतूक विस्कळित झाली आहे.

हवामान विभागाने कोकण विभागाला अलर्ट दिला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बीड, लातूर, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. पाऊस चांगल्या प्रमाणात न झाल्याने अनेक ठिकाणी पेरणी खोळंबल्या आहेत.

अनेक राज्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट : दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. दिल्ली प्रादेशिक हवामान केंद्र प्रमुख चरण सिंह यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील 2 दिवस अतिवृष्टी पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसाठी रेड अलर्ट आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानसाठी ऑरेंज अलर्ट आहे. दिल्लीत पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट आहे.

पुढील 24 तासांमध्‍ये कसे राहिल- पुढील 24 तासांमध्‍ये जम्मू-काश्मीर, कोकण आणि गोव्याच्‍या काही भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर निकोबार बेटे, सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, किनारी कर्नाटक, केरळ, अंदमान येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, तेलंगणाचा काही भाग, ईशान्य भारत, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.आंध्र प्रदेश, अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडूच्या समुद्रकिनारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दिल्लीसह हिमाचलमध्ये विक्रमी पावसाची नोंद-दिल्लीत 1982 पासूनचा पावसाचा विक्रम मोडला आहे. रविवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत दिल्लीत 24 तासांत 153 मिमी पाऊस एवढ्या पाऊसाची नोंद झाली आहे.हिमाचल प्रदेशमध्येदेखील 50 वर्षांतील पावसाचा विक्रम मोडला आहे. हवामान विभाग कार्यालय, शिमला, सोलनमधील आकडेवारीनुसार रविवारी 135 मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी 1971 मध्ये एकाच दिवसात 105 मिमी पावसाचा 50 वर्षांची नोंद झाली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पावसाचे वाढलेले प्रमाण पाहता सोमवारी सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तराखंडमध्ये जम्मूमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार:ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील गुलरजवळ उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याने एक जीप नदीत पडली. या अपघात तीन भाविक गंगेत बुडाले. बचाव पथकाकडून पाच जणांची सुटका करण्यात आली आहे. तर बुडालेल्या तिघांचा शोध सुरू आहे. तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. केंद्रशासित प्रदेशातील पुंछ जिल्ह्यातील डोग्रा नाला ओलांडताना अचानक आलेल्या पुरात वाहून गेलेल्या दोन जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. नद्यांनी धोक्याची पातडी ओलांडल्याने जम्मू-काश्मीरमधील कठुआ आणि सांबा जिल्ह्यांसाठी तसेच खालच्या पाणलोट क्षेत्रासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा-

  1. Maharashtra Weather Update Today: रेड अलर्ट असताना रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण ओव्हरफ्लो, सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
  2. weather forecast update today : हिमाचल, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, केरळमध्ये आतापर्यंत 10 हजार नागरिक विस्थापित
Last Updated : Jul 10, 2023, 8:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details