भोपाळ (मध्यप्रदेश): मध्यप्रदेशची राजधानी भोपाळसह मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये आज दात धुके दिसून आले आहे. तर मध्यप्रदेशच्या पूर्वेकडील रीवा आणि सतना जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाची नोंद झाली, असे भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. दुसरीकडे सुधारित हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात 26 जानेवारीपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 26 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत राज्यातील नासिक, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मंगळवारी, बुधवारी हलक्या सरींची अपेक्षा:भारताच्या उत्तरेकडील भागांवरील पश्चिमी विक्षोभामुळे, नैऋत्य-पश्चिम राजस्थानवर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. ज्यामुळे दक्षिण-पूर्वेकडून आणि काही वेळा दक्षिणेकडून वारे वाहत होते, असे IMD च्या भोपाळ कार्यालयाचे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ एचएस पांडे यांनी एजन्सीला सांगितले. यामुळे मध्यप्रदेशातील काही भागात ढगाळ हवामान झाले आहे, ज्यामुळे लोकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे आणि पुढील सुमारे एक आठवडा असेच हवामान राहण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. IMD नुसार, मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी हलक्या सरींची अपेक्षा आहे.
मध्यप्रदेशात पडला पाऊस:आज भोपाळ, दमोह आणि शिवपुरी जिल्ह्यांमध्ये 500 ते 1,000 मीटरपर्यंत दृश्यमानता होती, असे ते म्हणाले. पूर्व मध्यप्रदेशातील सतना आणि रीवा येथे गेल्या 24 तासांत अनुक्रमे 1.8 मिमी आणि सुमारे 1 मिमी हलक्या पावसाची नोंद झाली, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. मध्य प्रदेशातील दतिया येथे ८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. ग्वाल्हेर वगळता राज्याच्या इतर भागात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या वर राहिल्याने लोकांना थंडीच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळाला, असे ते म्हणाले.
उत्तराखंडमध्ये थंडीची लाट:सुरु आहे. डोंगरापासून मैदानापर्यंत थंडीची लाट पसरली आहे. हिमालयाच्या उंच भागात बर्फवृष्टी होत असल्याने थंडी वाढली आहे. अनेक भागात पाऊसही पडत असून थंडीपासून वाचण्यासाठी लोक शेकोटीचा सहारा घेत आहेत. डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाल्यानंतर लोक घरात राहणे पसंत करत असून, बाजारपेठेत शांतता आहे. बर्फवृष्टी आणि पावसामुळे जोशीमठमधील बेघर लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकांना आपल्या कुटुंबासह मदत छावण्यांमध्ये राहावे लागत आहे आणि या कडाक्याच्या थंडीत ते जगत आहेत.