कर्नाटक (बेंगळुरू) "घाबरण्याची गरज नाही. पण आतापासूनच खबरदारी घ्यायला हवी."नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या आधी पब आणि रेस्टॉरंटमध्ये मोठी गर्दी होईल. त्यामुळे कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे आरोग्यमंत्री म्हणाले आहेत. (Masks are mandatory in Karnataka) बेळगाव येथील सुवर्ण विधान सौधा येथे आरोग्य विभाग आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मंत्री आर. अशोक यांनी पत्रकारांशी बोलत होते. राज्यात मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. मास्क न लावल्यास सध्या कोणताही दंड नाही. तथापि, लोकांच्या हितासाठी खबरदारी घेणे आणि मास्क घालणे बंधनकारक आहे असही ते म्हणाले आहेत.
Mask Compulsory: कर्नाटकात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे सक्तीचे, आरोग्य मंत्री के. सुधाकर यांची माहिती - Mask Compulsory
अनेक देशांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटकमधील रेस्टॉरंट, पब, थिएटर हॉल, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. (Mask Compulsory) कर्नाटकचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी ही माहिती दिली आहे.
सर्वांसाठी मास्क अनिवार्य - सर्व थिएटर, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इनडोअर इव्हेंट्स, सार्वजनिक ठिकाणे, सभा, समारंभ, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मास्क अनिवार्यपणे परिधान करावे. राज्यातील सर्व हॉटेल्स, पब, बार, रेस्टॉरंट आणि रिसॉर्ट्समध्ये मालक आणि कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि लसीचे 2 डोस अनिवार्य करण्यात आले आहेत. लसीचा तिसरा बूस्टर डोस घेणे देखील चांगले आहे. लोकांना फक्त हॉटेल्स, पब आणि रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध असलेल्या जागांवरच परवानगी द्यावी. कोणतीही नवीन अतिरिक्त आसन व्यवस्था करता येणार नाही. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी, बेंगळुरूमधील एमजी रोड आणि ब्रिगेड रोडसह सर्वत्र सर्वांसाठी मास्क अनिवार्य आहेत असही ते म्हणाले आहेत.
जागरूकता यावर बैठक - फक्त पहाटे 1 वाजेपर्यंत उत्सवांना परवानगी असेल. रात्री 1 नंतर नवीन वर्षाच्या कार्यक्रमांना परवानगी नाही. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि मुलांनी गर्दीच्या ठिकाणी आणि उत्सवात सहभागी न होणे चांगले आहे अस ते म्हणाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज दुपारी 4 वाजता इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) सोबत कोविड-19 ची तयारी, परिस्थिती आणि जागरूकता यावर बैठक घेतली आहे.