पणजी- जे आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन आम्ही सरकार स्थापन करू. आमचा नैसर्गिक मित्र असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्याशी चर्चा चालू असून, दोघेही एकत्र येऊन सरकार स्थापन करू, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली ( Devendra Fadnavis On Goa Election) आहे.
Goa Election 2022 : गोव्यात जे सोबत येतील त्यांना घेऊन आम्ही सत्ता स्थापन करू : देवेंद्र फडणवीस - गोवा विधानसभा निवडणुक निकाल
गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाला ( Goa Assembly Election Result 2022 ) अवघे काही तास बाकी असताना दुसरीकडे भाजपने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. गोव्यामध्ये जे कुणी सोबत येतील त्यांना घेऊन आम्ही सत्ता स्थापन करू असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis On Goa Election ) आगामी राजकारणाची वाटचाल स्पष्ट केली आहे.
भाजपाची अत्यंत महत्त्वाची बैठक
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल झाले आहेत. गोवा येथील हॉटेल ताज विवांतामध्ये भाजपाची अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासह प्रदेशाध्यक्ष तानवडे आणि भाजपाचे सर्व उमेदवार उपस्थित आहेत. गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मतमोजणीच्या ( Goa Assembly Election Result 2022 ) काही तास अगोदर भाजपाची अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल झाले आहेत.