नवी दिल्ली :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या बैठकीत बोलताना परखडपणे आपले विचार व्यक्त केले आहेत. आपल्याला निडर लोकांची गरज असून भाजपला घाबरणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला पाहिजे असे राहुल गांधी अत्यंत परखडपणे या बैठकीत म्हणाले आहेत.
नागालँड कॉंग्रेसचे खासदार उत्तम कुमार रेड्डी यांनी राहुल गांधींचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
आम्हाला निडर लोकांची गरज -
अनेक निडर लोक आहेत, जे काँग्रेसमध्ये नाहीत. त्यांना पक्षात आणले पाहिजे आणि भाजपला घाबरणाऱ्या लोकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला पाहिजे. आरएसएसच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्यांची आपल्याला गरज नाही. आपल्याला निडर लोक हवेत असे परखड विचार राहुल गांधींनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा -...म्हणून राहुल गांधी संसदीय समितीच्या बैठकीतून पडले बाहेर