महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही सोडलेली नाही आणि सोडणार नाही : एकनाथ शिंदे

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना (Balasaheb Thackerays Shiv Sena) आम्ही सोडलेली नाही आणि सोडणार नाही ( will not leave it). असे शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी गुजरातमधील सुरत विमानतळावर बोलताना स्पष्ट केले आहे. महारराष्ट्रातील राजकीय संकटाच्या (Political Crises In Maharashtra ) पार्श्वभुमीवर त्यांचे वक्तव्य महत्वाचे समजले जात आहे.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे

By

Published : Jun 22, 2022, 5:18 AM IST

सुरत:बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही सोडलेली नाही आणि सोडणार नाही. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा पाठपुरावा करत आलो आहोत आणि पुढेही चालवू, असे मत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गुजरातमधील सुरत विमानतळावर बोलताना व्यक्त केले आहे. राज्यात दिवसभर चाललेल्या राजकीय नाट्यानंतर रात्री उशीरा सोबतच्या आमदारांना घेऊन शिंदे सुरत विमानतळावरुन रवाना झाले. त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.

सुरत येथील हाॅटेल मधे थांबलेले शिंदे तसेच शिवसेनेचे आणि अपक्ष असे सुमारे ४१ आमदार दिवसभरात कोणताही तोडगा न निघाल्यामुळे नेमके काय करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. या आमदारांना थेट मुंबईत राजभवनात आणनार की आणखी दुसऱ्या एखाद्या ठिकाणी नेणार यावर तर्क वितर्क लढवले जात होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी या बंडाशी भाजपचा संबंध नसल्याचे सांगितले मात्र या मोहिमेच्या वेळी भाजपचे मोहित कंभोज तसेच संजय कुटे यांच्या सोबत असल्याचे पहायला मिळाल्याचे सांगितले जाते.

रात्री २. १५ च्या सुमारास या आमदारांना ट्रॅव्हल्सच्या बसने सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आनण्यात आले त्यावेळी इतर आमदार चेहरा लपवुन आणि माध्यमांना टाळून पळताना दिसत होते. त्या गोंधळात माध्यम प्रतिनिधीनी शिंदे यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलेकी, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडलेली नाही आणि सोडणारही नाही.त्यांच्या विचारापासून फारबाकतही घेणार नाही. बाळासाहेबांची कडवड शिवसेना आम्ही पुढे घेऊन जात आहोत.

हेही वाचा : Political Crises In Maharashtra : बंडखोर आमदारांना सुरतहुन विमानाने हलवले

ABOUT THE AUTHOR

...view details