नवी दिल्ली:केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी सांगितले की, सरकारने पेट्रोलमध्ये 2030 पर्यंत इथेनॉलचे मिश्रण 20 टक्क्यांनी वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. असे असले तरी, या दिशेने वेगाने काम केले जात आहे, जेणेकरून हे लक्ष्य आता 2025-26 पर्यंत पूर्ण केले जाईल. इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (IFGE) - CBG प्रोड्यूसर्स फोरमच्या ग्लोबल CBG परिषदेला संबोधित करताना पुरी म्हणाले की, भारत सरकारने देशातील ऊर्जा आणि वाहतुकीमध्ये जैवइंधनाचा वापर वाढवण्यासाठी जैवइंधन 2018 वर राष्ट्रीय धोरण आणले आहे.
आयात कमी करण्याचे उद्दिष्ठ:स्वदेशी जैवइंधन उत्पादन निव्वळ शून्य आणि आयात कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. आम्ही पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 2013-14 मधील 1.53 टक्क्यांवरून जुलै 2022 मध्ये 10.17 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. यामुळे देशातून बाहेर जाणारे 41,500 कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे. शेतकर्यांना 40,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वेळेवर देण्यात आली आहे आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात 27 लाख टनांनी घट झाली आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे 2030 पर्यंतचे उद्दिष्ठ 2025-26 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आता करण्यात आला आहे.