हैदराबाद ( तेलंगणा ) :जुबली हिल्स पोलिसांनी अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासाला गती दिली ( jubilee hills rape case ) आहे. सोमवारी आरोपी अल्पवयीन मुलांची चौकशी करण्यात आली. यावेळी एक जण काहीही बोलला नाही. दोघांनी या प्रकरणात काही खळबळजनक तथ्ये सांगितली. विश्वसनीय माहितीनुसार, आरोपींनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी इंग्रजी चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेरणा घेत मुलीवर बलात्कार केला.
परीक्षा झाल्यापासून दररोज पबमध्ये :आरोपीने पोलिसांना सांगिले की, "परीक्षा पूर्ण झाल्यापासून आम्ही खूप मोकळे होतो. आम्ही जवळजवळ दररोज पबमध्ये जातो. आम्ही पार्ट्यांमध्ये भेटत होतो. त्यादिवशी (28 मे 2022) आम्ही अॅम्नेशिया पबमध्ये गेलो. पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रिणीशी आमची ओळख झाली. आम्हाला त्यांना डेटवर जाण्यास सांगायचे होते. त्या हसत, बोलत होत्या आणि निष्पाप दिसत होत्या. त्यामुळे आम्हाला त्यांना बाहेर घेऊन जात काहीतरी करायचे होते.
घरी सोडतो म्हणत केला बलात्कार :सुरुवातीला आम्हाला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती म्हणून आम्ही त्यांच्याशी चुकीचे वागलो. कारण आमच्या वाईट वागणुकीमुळे त्या दोघी बाहेर गेल्या. आम्ही त्यांचा पाठलाग केला. पीडितेची मैत्रीण तिच्या घरी गेली. आमच्याकडे आता एकच पर्याय होता आणि आम्हाला तो गमवायचा नव्हता. म्हणून आम्ही पीडितेला आमच्यावर विश्वास ठेऊन सांगितले की, आम्ही तिला घरी सोडतो. खरं तर, आम्हाला तिच्यावर बलात्कार करायचा होता. म्हणून आम्ही केला. आम्ही इंग्रजी चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेरित झालो, असे दोन आरोपींनी पोलिसांना सांगितले.