महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Girl Trafficking : न्यायमूर्ती बॅनर्जी म्हणाल्या, तस्करीची शिकार झालेल्या त्या १४ वर्षीय मुलीविषयी विचार करून अंगावर काटे येतात - सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी

न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी ( SC Justice Indira Banerjee ) म्हणाल्या की, 'हे न्यायालय अत्याचार आणि त्यानंतर अत्याचारित लोकांना सहन कराव्या लागणाऱ्या बदनामीला समजू शकते. जर तुम्ही म्हाला व्यक्तिगतरीत्या विचारलं तर माझ्या मनात अशा महिलांविषयी पूर्णपणे सन्मान आहे, ज्या महिलांना या क्षेत्रात ढकलले ( Justice Banerjee On Girl Trafficking ) जाते.

गंगूबाई काठियावाडी
गंगूबाई काठियावाडी

By

Published : Feb 25, 2022, 3:34 PM IST

नवी दिल्ली : 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाच्या ( Gangubai Kathiawadi Movie ) प्रदर्शनाला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी ( SC Justice Indira Banerjee ) यांच्यासमोर सुनावणी झाली. बॅनर्जी म्हणाल्या की, 'पश्चिम बंगाल विधी सेवा प्राधिकरणात काम करत असताना 14 वर्षांची मुलगी मला भेटली होती. नोकरी देण्याच्या बहाण्याने तिची तस्करी झाली होती. त्या मुलीचा विचार करून आजही अंगावर शहारे ( Justice Banerjee On Girl Trafficking ) येतात.'

न्यायमूर्ती बॅनर्जी म्हणाल्या की, 'या छळानंतर अशा लोकांना सहन करावा लागणारी बदनामी हे न्यायालय समजू शकते. तुम्ही मला वैयक्तिकरित्या विचाराल तर, यात ढकलल्या गेलेल्या महिलांबाबत मला पूर्ण आदर आहे.

बॉलीवूड चित्रपट गंगूबाई काठियावाडीच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देताना न्यायालयाने गुरुवारी ती फेटाळून लावली. चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या भन्साळी प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली निर्मित हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details