महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

TN Minister Subramaniam : नयनतारा-विग्नेश सेरोगेसी प्रकरणातील चाचणी अहवाल लवकरच समोर येतील - आरोग्य मंत्री - Child birth through surrogacy

नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश सिवन यांनी सरोगसीद्वारे रुग्णालयात मुलाला जन्म ( Child birth through surrogacy ) दिला. त्या रुग्णालयाचा तपशील समोर आला असून गरज पडल्यास नयनतारा आणि विघ्नेश सिवन यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असे मंत्री सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.

TN Minister Subramaniam
TN Minister Subramaniam

By

Published : Oct 15, 2022, 11:08 AM IST

चेन्नई : एक्टर नयनतारा दिग्दर्शक विघ्नेश सिवन यांना सरोगेट मदरच्या माध्यमातून बाळ ( Nayantara and filmmaker Vignesh Sivan ) झाले. ते नियमात आहे का ? याचा शोध घेण्यासाठी तामिळनाडू सरकारने एक समिती स्थापन ( Tamil Nadu Govt ) केली. वैद्यकीय समितीची चौकशी सुरू असताना मंत्री एम. सुब्रमण्यन ( Minister Subramaniam ) यांनी याबाबत पत्रकारांच्या प्रश्नांनाल त्याबाबतची उत्तरे दिली.

जुळ्या मुलांना जन्म :मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, नयनतारा आणि विघ्नेश यांनी कोणत्या रुग्णालयात जाऊन सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म ( Birth of twins through surrogacy ) दिला. हे वैद्यकीय विभागाने शोधून काढले आहे. या संदर्भात आरोग्य विभागाच्या सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.

सरोगसीमध्ये अनियमितता : सरोगसीमध्ये काही अनियमितता आहेत का? बेकायदेशीर कृत्यांमध्ये कोणाचा हात आहे का, याचा तपास करण्यासाठी आठवडाभरात चौकशी अहवाल सादर केला जाईल. सरोगेट मदर प्रकरणी गरज पडल्यास अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश यांना चौकशीसाठी बोलावले जाईल. असे मंत्री एम. सुब्रमण्यम यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details