कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 291 मतदासंघासाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. यात ममतांनी तीन जागा कलिम्पोंग, दार्जिलिंग आणि कुरसेओंग येथे आपले उमेदवार उतरवले नाहीत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी सरकार आणि राज्यातला विरोधी पक्ष भाजपासाठी चहाचा पट्टा असलेला दार्जिलिंग महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे दिसत आहे.
गोरखा जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बिमल गुरुंग यांनी तीनही जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली. तर इतर 14 मतदारसंघात ते तृणमूल काँग्रेसला समर्थन देणार आहेत. तर जीजेएमचा प्रतिस्पर्धी गट बेनोय तमांगनेही तीनही जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. बेनोय तमांग आणि बिमल गुरुंग यांचे नेतृत्वात जीजेएम गट हा टीएमसीचा सहयोगी आहे. या निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पार्टी (भाजपा) बरोबर त्रिकोणी स्पर्धेकडे वळलो, तरी ते एकमेकांविरोधात निवडणूक लढवतील, असे दोन्ही गटाने म्हटलं होते.