कोलकाता :येत्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानावेळी, बुरखा घातलेल्या मतदारांची तपासणी करण्यासाठी महिला सीपीएफ कर्मचारी तैनात करावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. मुस्लीमबहुल भागांमध्ये होणाऱ्या मतदानावेळी अशी तपासणी करण्यात यावी, अशी मागणी पक्षाने निवडणूक उपायुक्तांकडे पत्र लिहीत केली आहे.
मुस्लीम भागामध्ये मतदानावेळी महिला बहुतांश करुन बुरख्यामध्ये येतात. त्यावेळी सीपीएफ जवान त्यांची ओळख तपासू शकत नाहीत. त्यामुळेच यासाठी संबंधित विभागांमध्ये पुरेशा प्रमाणात महिला सीपीएफ जवान तैनात करावेत अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.