कोलकाता -आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या व प्रचंड उत्सूकता ताणलेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने धुळदाण उडवली. प्रचंड अटीतटीच्या झालेल्या लढतीत नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना पराभव पत्करावा लागला. भाजपचे सुवेंदु अधिकारींनी ममतांचा १७३६ मतांनी पराभव केला. आधी ममतांनी १२०० मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते मात्र पुर्नमतमोजणीत ममता बॅनर्जी यांचा १७३६ मतांनी पराभव झाला.
याबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. दरम्यान नंदीग्रामध्ये फेर मतमोजणीची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ममतांनी म्हटले आहे, की बंगालच्या जनतेने भाजपला नाकारून देश वाचवला आहे. आम्ही २२१ जागांवर विजय मिळवत आहोत. नंदीग्रामच्या जनतेने दिलेल्या कौलचा मी आदर करते.