कोलकाता -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने रविवारी कोलकाता येथे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांची भेट घेऊन मुख्यमंत्री ममता ममता बॅनर्जी यांचा वैद्यकीय अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी केली.
ममता बॅनर्जी यांनी प्रथम आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा केला. निवडणूक आयोगाने हा हल्ला नसून एक अपघात असल्याचे म्हटले. तसेच ममता यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेच सभा घेतली. हा हल्ला फक्त जनतेकडून सहानुभूती मिळवण्यासाठी असून यात डॉक्टरांचाही सहभाग असल्याचे भाजपाने म्हटलं. या सर्व पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा वैद्यकीय अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
टीएमसीकडून आदर्श आचारसंहितेचा भंग -
टीएमसीने भाजपावर केलेला आरोप आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचे पत्रात नमूद केले आहे. सत्य समोर आणले जाणे आवश्यक आहे. जेणेकरुन जनतेला फसवून त्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या, अशा घटनांचा पुनरावृत्ती होऊ नये, असे ते म्हणाले. कोलकाता येथील हजारा येथे रविवारी ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवरुन रोड शो घेतला होता. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली.