बंगळुरू, कर्नाटक - शहरामध्ये सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले Bangalore city flooded आहे. आंतरराष्ट्रीय सुविधा असलेल्या बंगळुरू विमानतळावर Bangalore Airport सर्वत्र पाणी साचले आहे. प्रवाशांना त्या पाण्यातूनच वाट काढत जावे लागत असल्याचे चित्र विमानतळावर दिसत Waterlogging in Bengaluru airport आहे.
बंगळुरू शहरात सततच्या मुसळधार पावसानेपाणी साचले आहे. शहहात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणवले जाणारे बंगळुरू विमानतळही याला अपवाद ठरलेले नाही. विमानतळावरही सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. देशविदेशातून येणारे-जाणारे प्रवासी याच पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत. यामुळे काही प्रवासी वैतागले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशी अवस्था असेल तर शहरातील रस्त्यांची स्थिती विचारायलाच नको, असे उद्विग्न प्रतिक्रिया ट्विटरवर प्रवासी देत आहे. एका ट्विटर युजरने तर ही लाजीरवाणी बाब असल्याचे सांगत, मला तर ही स्थिती पाहून रडावेसे वाटत आहे, असे म्हटले आहे.
बंगळुरूतील कोरमंगलासहअनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि सामान्य लोकांचे जीवन विस्कळीत झाले. मराठहळ्ळी-रेशीम मंडळ जंक्शन रोडजवळ एका व्यक्तीला पाणी साचलेल्या रस्त्यावर अडकल्याने स्थानिक सुरक्षा रक्षकांनी वाचवले. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मराठहळ्ळी-रेशीम मंडळ जंक्शन रोडवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.