चामराजनगर (कर्नाटक) - एका दलित महिलेने नळातून पाणी प्यायल्याने पाण्याची टाकी रिकामी करून स्वच्छ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Dalit woman drank water from tap). चामराजनगर तालुक्यातील हेगगोथारा गावात शुक्रवारी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. (Water tank cleaned after Dalit woman drank water).
धक्कादायक! दलित महिलेने पाणी पिल्यामुळे गावकऱ्यांनी स्वच्छ केली टाकी! - गावकऱ्यांनी स्वच्छ केली संपूर्ण टाकी
घटनेनंतर चामराजनगरचे तहसीलदार बसवराजू यांनी ईटीव्ही भारतला प्रतिक्रिया देताना दोषींवर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. (Water tank cleaned after Dalit woman drank water).
![धक्कादायक! दलित महिलेने पाणी पिल्यामुळे गावकऱ्यांनी स्वच्छ केली टाकी! Water tank cleaned after Dalit woman drank wate](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16982420-thumbnail-3x2-dalit.jpg)
लग्नासाठी आले होते गावात - एका दलित तरुणाच्या विवाह सोहळ्यासाठी वधू पक्षाचे मंडळी एचडी कोटे तालुक्यातील सरगूर येथून हेगोथारा गावात आले होते. दुपारच्या जेवणानंतर बसमध्ये जात असताना एका महिलेने गावातील रस्त्यावरील नळातून पाणी प्यायले. त्याच गल्लीतील लोकांनी ते पाहिले आणि ही महिला दलित समाजाची असल्याचे समजताच त्यांनी पाणी रिकामे करून धुतले, असा आरोप करण्यात आला आहे.
दोषींवर कारवाईचे आश्वासन - या घटनेबाबत चामराजनगरचे तहसीलदार बसवराजू यांनी ईटीव्ही भारतला प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'या घटनेबाबत चर्चा सुरू आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत अहवाल आणला आहे. मात्र आता घटना घडल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही. मी रविवारी त्या ठिकाणी जाऊन तपासणी करून दोषींवर कारवाई करेन,' असे ते म्हणाले.