नवी दिल्ली Washington Post Says Report on Apple Hack : 'द वॉशिंग्टन पोस्ट'नं भारत सरकारवर अॅपलला लक्ष्य केल्याचा कथित अहवाल केंद्र सरकारने फेटाळलाय. सरकारी हॅकर्सनी स्वतंत्र पत्रकार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचे आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा अमेरिकन वृत्तपत्राच्या अहवालात करण्यात आला होता. या वृत्ताला उत्तर देताना केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी या अहवालाला 'भयानक' म्हटलंय.
द वॉशिंग्टन पोस्टचा दावा काय : वॉशिंग्टन पोस्टनं 27 डिसेंबर रोजी अॅम्नेस्टीच्या सहकार्यानं एक अहवाल प्रकाशित केला. यात काही पत्रकारांना त्यांच्या आयफोनवर स्पायवेअरनं लक्ष करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. याची माहिती ऑक्टोबर महिन्यात उघड झाली होती. अॅपलनं ऑक्टोबरमध्ये स्वतंत्र पत्रकार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना चेतावणी दिली होती. त्यानंतर एका दिवसानंतर पीएमओ अधिकाऱ्यांनी तात्काळ अॅपलवर कारवाई केली होती.
केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता : केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या अहवालावरुन चिंता व्यक्त केलीय. ते म्हणाले की, 31 ऑक्टोबरच्या धमकीच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या अपलच्या प्रतिसादाचा या अहवालात समावेश नाही. अॅपल कोणत्याही विशिष्ट राज्य-प्रायोजित उल्लंघनासाठी धोक्याच्या सूचनांचं श्रेय देत नाही. काही नोटिफिकेशन्स खोट्या अलार्म असू शकतात, अॅपलच्या याच प्रतिक्रियेचा चंद्रशेखर यांनी दाखला दिलाय.
अॅपल अलर्टशी संबंधित चौकशी सुरु : राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलं की, अॅपलला सीईआरटी-इनच्या चौकशीत सहभागी होण्यास सांगितलं होतं. अॅपल अलर्टशी संबंधित चौकशी सुरु आहे. अॅपलनं गेल्या महिन्यांत काही भारतीय नेत्यांना धमक्या देणार्या सूचना प्राप्त केल्याच्या मुद्द्याचा शोध घेण्यासाठी तज्ञांची एक टीम पाठवली आणि त्यांचं डिव्हाइसवर सरकारी हॅकर्सद्वारे लक्ष ठेवलं जात असल्याचा इशारा दिला होता.
हेही वाचा :
- Apple Phone Hacking Alert : आयफोनवर आलेल्या हॅकिंगच्या इशाऱ्याची होणार चौकशी, सरकारचे आदेश
- Apple iPhone १५ Series : आयफोन खरेदीसाठी मुंबईतील अॅपल स्टोअरबाहेर नागरिकांची गर्दी; 15 सिरीज भारतात उपलब्ध
- Apple CEO Tim Cook : अॅपलचे भारतात पहिले रिटेल स्टोअर लाँच; लॉन्चिंग इव्हेंटमध्ये सेलिब्रिटींनी दिली सीईओ टिम कुकसोबत पोझ