मुंबई -प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी पत्रकारांसमोर नारा दिला, 'जय बांगला, जय मराठा!' प. बंगालच्या वाघिणीची ही गर्जना भविष्यातील राजकारणाची नांदी आहे. मुंबईत येऊन त्यांना उद्धव ठाकरे यांना भेटायचे होते. ती भेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आजारपणामुळे झाली नाही. ममता बॅनर्जी यांनी प. बंगालात जो 'खेला होबे' केला. दिल्लीचा अतिरेक रोखण्याचा, तोच खेळ महाराष्ट्रात झाला.( Rokthok Artical ) सत्ता, पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रचंड दहशतवाद याचा पराभव प. बंगाल आणि महाराष्ट्राने केला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा होता. एका राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या दौऱ्यावर जातात तेव्हा फार स्वागत होत नाही. ममता बॅनर्जी त्यास अपवाद आहेत. प. बंगालातून जणू बहीणच दोन दिवसांसाठी पाहुणचारास आली, असे मुंबईकरांना वाटले. ( Sanjay Raut Rokhthok Article ) ही बहीण सिद्धिविनायक मंदिरात गेली. गणपतीपुढे नतमस्तक झाली व हात जोडून तिने उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. संध्याकाळच्या भेटीत त्या म्हणाल्या, ''गणपतीचा 'लाडू' म्हणजे मोदक मला फार आवडतो. ( Mamta Banerjee Mumbai Visit ) कोलकात्यातील मराठी लोक मला नेहमी मोदक पाठवतात. कोलकात्यात मराठी समाज आहे. त्यांचे आमचे संबंध उत्तम आहेत. महाराष्ट्र मंडळात आमच्या नियमित बैठका होत असतात. प. बंगालचे महाराष्ट्राशी नाते कायम टिकले पाहिजे!'' असा आशावाद ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरेंबरोबर
दिल्लीत ममता बॅनर्जी यांना भेटण्याचा योग अनेकदा येतो. मुंबईच्या 'ट्रायडेण्ट' हॉटेलात श्री. आदित्य ठाकरे यांच्या सोबतीने त्यांना भेटलो. ममता मुंबईतील उद्योगपतींना भेटण्यासाठी आल्या. उद्योगपतींनी प. बंगालात यावे हे निमंत्रण घेऊन त्या आल्या. त्यांनी उद्योगपतींची बैठक विनम्रपणे बोलावली. ( Mamata Banerjee Slammed Modi ) तेव्हा मला गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मुंबई दौऱ्याची आठवण झाली. मुंबईतील उद्योगपतींना गुजरातेत येण्याचे निमंत्रण घेऊन त्या आल्या व मुंबईत येऊन मुंबईचीच बदनामी करून गेल्या. ''मुंबई में क्या रखा है? इथले रस्तेही खराब आहेत. तेव्हा गुजरातला चला.'' असे निमंत्रण त्यांनी दिले. तेव्हा महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील विकासाचे उद्योगपतींकडे कौतुक केले व प. बंगालकडे दृष्टी वळवा, असे सांगितले. शेवटी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, पण महाराष्ट्राचीही ती राजधानी आहे. याचे भान ठेवून जे राज्यकर्ते मुंबईत उतरतात त्यांचे स्वागत आहेच. देशाचा आर्थिक भार मुंबईच्या डोक्यावर आहे. मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज आहे. ( Business industrialists Mumbai ) देशाच्या विकासात महाराष्ट्राच्या राजधानीने हातभार लावला तर ते राष्ट्रीय कार्यच ठरेल. महाराष्ट्राने प. बंगालच्या विकासासाठी सहकार्य करायला हवे. श्री. आदित्य ठाकरे यांच्याकडे ममता बॅनर्जी यांनी एक मागणी केली, ''प. बंगालमधून मुंबईत उपचारासाठी लोक येतात. विशेषतः परळच्या टाटा कॅन्सर इस्पितळात. त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. प. बंगालला एखादा भूखंड मिळाला तर तेथे 'बंगाल भवन' उभारता येईल व अशा गरजूंची व्यवस्था करता येईल.'' ममता बॅनर्जी यांची मागणी अवाजवी नाही. मुंबईच्या आसपास ओडिशा भवन, उत्तर प्रदेश भवन आधीच उभे राहिले आहे. प. बंगालचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक क्रांतीत योगदान आहे. दोन राज्यांत एक भावनिक नाते आहे. ते टिकवायला हवे.
प्रचंड विजय