लखनऊ - सुप्रसिद्ध डान्सर सपना चौधरी (Sapna Chaudhary) सध्या चर्चेत आहे. लखनौ न्यायालयाने सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट जारी (warrant against dancer sapna chaudhary) केले असून तिला २२ नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
14 ऑक्टोबर 2018 रोजी एसआई फिरोज खान ने आशियाना पोलीस ठाण्यात एक FIR दाखल केला होता. एका प्रकरणात सपना चौधरीच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रत्यक्षात, एकेकाळी बिग बॉसमध्ये (Big Boss) सहभागी झालेल्या हरियाणवी सिंगर आणि डान्सर सपना चौधरीवर तिच्या चाहत्यांची मनं मोडल्याचा आरोप करण्यात आला आहे, सपना चौधरीवर मनमानीपणे एक कार्यक्रम रद्द करण्याचा आणि तिकीट खरेदी करणाऱ्यांना पैसे परत न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनू त्यागी (ACJM Shantanu Tyagi) यांच्या न्यायालयाने या प्रकरणी सपना चौधरीविरुद्ध वॉरंट जारी करताना या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.
२२ नोव्हेंबरला पुढील सुनावणी
लखनौ हायकोर्टमध्ये करण्यात आलेल्या तक्रारीवर सपना चौधरीवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी होईपर्यंत पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. चिफ ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट शांतनू त्यागी यांनी यावर सुनावाणी करताना सांगितले आहे, की पुढील सुनावणी २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.