अमृतसर (पंजाब):'वारीस पंजाब दे'चा प्रमुख खलिस्तानवादी अमृतपाल सिंग याची पत्नी किरणदीप कौर हिला पंजाब पोलिसांनी श्री गुरु राम दास आंतरराष्ट्रीय विमानतळ, अमृतसर येथून ताब्यात घेतले आहे. ती लंडनला जाणाऱ्या विमानात चढण्याचा प्रयत्न करत होती, असे पंजाब पोलिस सूत्रांनी सांगितले.
अमृतपाल सिंग याच्या पत्नीला पंजाब पोलिसांनी अमृतसर विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. अमृतपाल सिंग याची पत्नी लंडनला जाण्यासाठी निघाली होती, त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर लवकरच अमृतपाल सिंगही पोलिसांच्या ताब्यात जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पोलिसांनी किरण दीपला गुरु राम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतले आहे. इमिग्रेशन विभागाने चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, पोलीस यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी 11.30 वाजता किरणदीप अमृतसर विमानतळावर पोहोचली. दुपारी 1.30 चे विमान लंडनला रवाना होणार होते मात्र त्याआधीच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.