महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या साथीदाराचा पाकिस्तानमध्ये खात्मा - पाकिस्तानी दहशतवाद्यांची हत्या

Hanjala Adnan Killed : पाकिस्तानातील कराचीमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लष्कर-ए-तैयबाचा वॉन्टेड दहशतवादी हंजला अदनानची हत्या केली. हंजलाचा भारतात दहशतवादी कारवायांमध्ये हात होता.

Hanjala Adnan
Hanjala Adnan

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 3:16 PM IST

नवी दिल्ली Hanjala Adnan Killed :पाकिस्तानातभारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा करण्यात आला आहे. लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अदनान अहमद उर्फ ​​हंजला अदनान याची पाकिस्तानमधील कराची येथे हत्या करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये बीएसएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात त्याचा हात होता. याशिवाय तो मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा जवळचा मानला जात होता.

अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडल्या : रिपोर्ट्सनुसार, दोन दिवसांपूर्वीच त्याची हत्या झाली होती. ३ डिसेंबरच्या रात्री काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पाकिस्तानी लष्करानं त्याच्यासाठी उत्तम सुरक्षा व्यवस्था केली होती. मात्र तरीही ही घटना घडली आहे. गोळी झाडण्यात आली तेव्हा हंजला अदनान घराबाहेर होता. रिपोर्ट्सनुसार, गोळी लागल्यानंतर त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग होता : २०१५ मध्ये बीएसएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात २ जवान हुतात्मा झाले होते, तर आणखी १३ जवान जखमी झाले होते. तर २०१६ मध्ये पाम्पोरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात सैन्याचे ८ जवानांना वीरमरण आलं होतं, तर २२ जवान जखमी झाले होते. या दोन्ही हल्यांमागे हंजला अदनानचा हात होता.

या आधीही पाकिस्तानी दहशतवाद्यांची हत्या झाली : रिपोर्ट्सनुसार, हंजला पीओकेमध्ये खूप सक्रिय होता. तो तेथे लष्कर-ए-तैयबाचा प्रशिक्षण कार्यक्रम राबवून तरुणांना दहशतवादाकडे वळवत आहे. या आधी एजाज अहमद अहंगर, बशीर अहमद पीर, परमजीत सिंग पंजवाड आणि लतीफ यांचीही पाकिस्तानात अशाचप्रकारे हत्या झाली होती. या सर्वांचा भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आहे.

हेही वाचा :

  1. 'भारतीय संसदेवर हल्ला करू'; खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूची आणखी धमकी
  2. सुखदेव सिंह गोगामेडींच्या हत्येनंतर राजपूत समाज आक्रमक; आज 'राजस्थान बंद'ची हाक
  3. युद्धबंदी संपताच इस्रायलचा गाझावर 'एअर स्ट्राईक'; 175 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details