मुंबई :इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स भारताच्या सैन्य दलाचा एक भाग आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने भरतीची सुरुवात (Want job Indo Tibetan Police Force) केली आहे. नुकतेच ऑनलाइन अर्ज शासनाने सुरू केलेले असुन; यामध्ये विविध प्रकारच्या 23 जागांची भरती केली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन करण्याची (apply before 11th November) अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2022 आहे.
कोणत्या पदासाठी करायचे अर्ज :हेड कॉन्स्टेबल शिक्षण आणि तणाव समुपदेशक यासाठी 20 ते 25 वयोगटातील भारतीय व्यक्तींनी अर्ज करावा. वयाच्या संदर्भातील सवलत जी भारत सरकारच्या नियमाप्रमाणे अनुसूचित जाती आणि ओबीसी आणि एक्स सर्विस मॅन यांना ती पुढील प्रमाणे लागू असेल.
अनुसूचित जातीसाठी पाच वर्षे वयोमर्यादा सवलत आहे. ओबीसीसाठी तीन वर्षे, तर एक्स सर्विसमॅन साठी तीन वर्षे सवलत आहे. तर एक्स सर्विस मॅनमध्ये ओबीसी असेल तर, सहा वर्षे वयोमर्यादा सवलत आणि एक्स सर्विस मॅन अनुसूचित जाती असेल, तर आठ वर्षे वयापर्यंत उमेदवाराला वयाची सवलत आहे. तसेच विभागीय कर्मचाऱ्यांच्या उमेदवारासाठी पाच वर्षे वयाची सवलत असेल. तर 1984 च्या दंगलीत किंवा 2002 च्या गुजरातच्या दंगलीमध्ये मृत्यू पावलेल्यांचे जर मुलं असतील तर, त्यांच्यासाठी आर्थिक मागास स्तरातील उमेदवाराला पाच वर्षाची सवलत आहे. ओबीसी करीता आठ वर्षाची सवलत आणि अनुसूचित जातीसाठी दहा वर्षाची सवलत आहे. तर जे उमेदवार जम्मू आणि काश्मीर येथील रहीवासी असतील. त्यांचे डोमिसाईल प्रमाणपत्र 01 जानेवारी 1979 ते 31डिसेंबर 1989 पर्यंतच्या काळात निवास केलेला आहे. त्या आर्थिक मागास स्तरांतील उमेदवार करिता पाच वर्षे वयोगटाची सवलत, ओबीसीसाठी आठ वर्षे, तर अनुसूचित जाती साठी 10 वर्षे वयाची सवलत असेल.