हिवाळा (Winter) हा ऋतू अनेकांच्या आवडीचा. घामाचे ओघळ नाहीत, पावसाची रिपरिप नाही फक्त सुरेख वातावरण आणि हवेतला अल्हाददायक गारवा इतकेच काय ते. पण, हाच हिवाळा आवडत नाही, असे म्हणणारेही काहीजण आहेत. यातही त्यांना हिवाळा न आवडण्याचे कारण म्हणजे सतत रुक्ष होणारी, काळवंडणारी त्वचा. कडाक्याची थंडी आणि कोरडेपणा यामुळे त्वचेचे सौंदर्य बाधित होते. थंडीच्या दिवसात त्वचा बधिर झाल्यासारखी होते. ओठ, हातपाय या ऋतूत जास्त प्रभावित होतात. या काळात त्वचेची विशेष काळजी घेणे खुप गरजेचे असते. या समस्या टाळण्यासाठी थंडीच्या दिवसात काही गोष्टींचे सेवन करावे.
थंडीच्या दिवसात यांचे सेवन करावे:शक्य असल्यास काही प्रमाणात सुका मेवा (Dry fruits) खावा. रात्री झोपताना किमान 1 ग्लास दूध प्यावे. मूग, चणे यासारख्या कडधान्यांना आहारात प्राधान्य द्यावे. ताजी फळे किंवा सॅलडचे प्रमाण वाढवावे. दिवसातून शक्यतो 8 ते 10 ग्लास पाणी पिलेले बरे. जेवणात ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा.
फेस मास्क वापरणे टाळा:हिवाळ्यात फेस मास्क लावल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते. त्यामुळे फेस मास्कचा वापर करणे टाळा. त्याच्या ऐवजी तुम्ही मुलतानी माती किंवा बेसनच्या पिठाच्या पॅकचा लावू शकता. मुलतानी माती पाण्यात भिजवून त्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने तुमची त्वचा स्वच्छ होईल. तसेच चेहऱ्यावर हळद आणि गुलाब पाणी मिक्स करून लावल्याने देखील चेहऱ्यावर ग्लो येतो.
असे बॉडी लोशन वापरा:हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते. या वारावरणात चेहऱ्यावरच नाहीतर संपूर्ण शरीरावर चांगल्या बॉडी लोशनचा किंवा मॉयश्चरायझरचा (Use of Body Lotion) वापर करणे आवश्यक असते. बॉडी लोशन त्वचेसाठी एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते. परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडी लोशनचा वापर करणे आवश्यक असते. जर स्किन ड्राय होत असेल तर अशा बॉडी लोशनचा वापर करा ज्यामध्ये दूध आणि ग्लिसरीन मुबलक प्रमाणात असेल.
थंड पदार्थ टाळावेत:शक्यतो थंड पदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे. दही, तेलकट असे अँलर्जी निर्माण करणारे पदार्थ टाळा. सकाळी फिरायला जाणार्यांनी नाक-कानात हवा जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी झालेल्याचा संसर्ग टाळावा.