महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पश्चिम बंगालमध्ये आज पोटनिवडणूकीसाठी मतदान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भवितव्य ठरणार - ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये आज ३० सप्टेंबर पोटनिवडणूकीसाठी तीन ठिकाणी मतदान होत आहे. हे मतदान भवानीपुर, समसेरगंज आणि जंगीपुर या विधानसभा मतदारसंघात होत आहे. येथील भवानीपुर विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक रिंगणात आहेत. तर भाजपकडून प्रियंका टिबरीवाल आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून श्रीजीव विश्वास निवडणूक रिंगणात आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

By

Published : Sep 30, 2021, 9:16 AM IST

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये आज ३० सप्टेंबर पोटनिवडणूकीसाठी तीन ठिकाणी मतदान होत आहे. हे मतदान भवानीपुर, समसेरगंज आणि जंगीपुर या विधानसभा मतदारसंघात होत आहे. येथील भवानीपुर विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक रिंगणात आहेत. तर भाजपकडून प्रियंका टिबरीवाल आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून श्रीजीव विश्वास निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, निवडणूक होत असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या मतदानाची मतमोजणी ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

पूर स्थितीला सामोरं जाण्यासाठीही येथे कडेकोट व्यवस्था

सगळीकडेच मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पूर स्थितीला सामोरं जाण्यासाठीही येथे कडेकोट व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच, या भागात कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांच्या 200 मीटरच्या आत हे नियम लागू आहेत.

या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

भाजपाने पश्चिम बंगालमधील सर्वांचे लक्ष असलेल्या भवानीपूरमधून पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात पश्चिम बंगालमधील निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील याचिकाकर्त्या अ‍ॅड. प्रियंका टिबरीवाल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. प्रियांका यांनी २०२० मध्ये एंटलीमधून विधानसभा निवडणूकही लढवली होती, पण त्या पराभूत झाल्या होत्या.

200 मीटरच्या परिघात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी

भवानीपूरमधील 97 मतदान केंद्रांवरील प्रत्येक भुतवर जवान तैनात केले आहेत. बूथच्या बाहेर सुरक्षेचा कार्यभार कोलकाता पोलिस अधिकाऱ्यांच्या हातात असेल. कोलकाता पोलिसांनी एका आदेशात म्हटले आहे की, "कोणत्याही मतदान केंद्राच्या 200 मीटरच्या परिघात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही." दगड, शस्त्रे, फटाके किंवा इतर स्फोटक साहित्य आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details