महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

president election voting start : राष्ट्रपती पदासाठी आज मतदान; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मतदान - मतदान सुरू

देशाच्या राष्ट्रपती पदाकरीता मतदान ( President Election ) सुरू झाले आहे. माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएच्या उमेदवार आहेत तर विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा ( Yashwant Sinha ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात येऊन मतदान केले.

पंतप्रदान नरेंद्र मोदी
पंतप्रदान नरेंद्र मोदी

By

Published : Jul 18, 2022, 11:20 AM IST

Intro:Body:

नवी दिल्ली - देशाच्या राष्ट्रपती पदाकरीता आज मतदान ( President Election ) सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी संसद भवनात येऊन आज सकाळी मतदान केले. माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएच्या उमेदवार आहेत तर विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा ( Yashwant Sinha ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. देशातील आमदार, खासदार यासाठी मतदान करणार आहेत. सत्ताधारी भाजप आघाडीकडे 50 टक्क्यांहून अधिक मते असल्याने द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

द्रौपदी मुर्मू, यशवंत सिन्हा यांच्यात लढत -राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. भारतातील सर्वोच्च पद असलेले राष्ट्रपती हेच केंद्र सरकारचे प्रमुख असतात. या राष्ट्रपती पदासाठी आज देशभरात मतदान होत आहे. विविध राज्यांच्या विधिमंडळांमध्ये त्या त्या राज्यातील खासदार, आमदार आज मतदान करणार आहेत. माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएच्या उमेदवार आहेत तर विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा ( Yashwant Sinha ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा, राज्यसभा आणि विविध राज्यातील आमदारांच्या संख्याबळाचा विचार करता द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांचा विजय होईल असे मानले जात आहे.

हेरी वाचा -Vice President Election 2022: उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेनेचा यूपीएला पाठिंबा

Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details