मुंबईदोन महिन्यांपूर्वीच व्हीएलसी मीडिया प्लेअर ॲपवर VLC Media Player बंदी घालण्यात आली होती. केंद्र सरकारने आयटी कायदा 2000 अंतर्गत VLC मीडिया प्लेयर आणि व्हिडीओलेन प्रोजेक्टच्या वेबसाइटवर बंदी घातली आहे. VLC मीडिया प्लेयर आणि त्याची वेबसाईट दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. मात्र कंपनीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. आता VLC प्लेअरची वेबसाइट डाउन झाली आहे. डाउनलोड लिंक देखील ब्लॉक करण्यात आल्या आहेत. व्हीएलसी मीडिया प्लेअरची वेबसाईट ओपन केल्यावर वेबसाईट बॅन झाल्याचा मेसेज दिसत आहे.
याआधी चीनी ॲपवर बंदी व्हीएलसी मीडिया प्लेअर हे व्हिडीओलेन प्रोजेक्ट अंतर्गत फ्रान्सने तयार केलेले ॲप आहे. केंद्र सरकारने आता या ॲपवर बंदी घातल्याने ते ॲप आता भारतीयांनी डाऊनलोड करता येणार नाही. व्हीएलसी मीडिया प्लेअर एसीटी फायबरनेट व्हीआय यासारख्या इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांवरूनही हटवण्यात आले आहे. याआधी भारत सरकारने चीनी ॲपवर बंदी घातली होती. मात्र व्हीएलसी मीडिया प्लेअर चायनीय अप नाही हे फ्रान्समध्ये तयार करण्यात आले आहेत.