महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Visva Bharati to Amartya Sen : 'अमर्त्य सेन यांनी अनधिकृतपणे भूखंड बळकावला', विश्व भारतीचा खळबळजनक आरोप

विश्व भारतीने नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना पत्र पाठवून कॅम्पसमधील जमिनीवर अनधिकृत कब्जा केल्याचा आरोप केला आहे. त्यांना लवकरात लवकर जमीन 'हस्तांतरित' करण्यास सांगितले आहे. विश्वभारती हे केंद्रीय विद्यापीठ आहे ज्याचे कुलपती पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. रवींद्रनाथ टागोरांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विद्यापीठाच्या कुलगुरूंवर होत आहे.

By

Published : Jan 25, 2023, 12:41 PM IST

Visva Bharati to Amartya Sen
विश्व भारतीचा अमर्त्य सेन यांच्यावर आरोप

कोलकाता : विश्व भारती केंद्रीय विद्यापीठाने मंगळवारी नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना पश्‍चिम बंगालमधील शांतिनिकेतन येथील भूखंडाचा ताबा परत देण्याची विनंती केली आहे. विद्यापीठाने दावा केला की अमर्त्य सेन यांनी हा भूखंड अनधिकृतपणे बळकावला आहे. केंद्रीय विद्यापीठाच्या उपनिबंधकांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, प्रसिद्ध अर्थतज्ञांचे निवासस्थान अतिरिक्त 13 दशांश जमिनीचा समावेश असलेल्या परिसरात बांधण्यात आले आहे. युनिव्हर्सिटीने असेही म्हटले आहे की, ते दाव्यांची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या प्रतिनिधींच्या देखरेखीखाली किंवा सर्व्हेअर किंवा सेन यांनी नियुक्त केलेले वकील यांच्या देखरेखीखाली संयुक्त सर्वेक्षण करण्यास तयार आहे.

सेन यांच्या वडिलांनी जमीन भाड्याने घेतली : पत्रात असे म्हटले आहे की, रेकॉर्ड आणि भौतिक सर्वेक्षण/सीमांकनावरून असे समोर आले आहे की, विश्व भारतीच्या 13 दशांश जमिनीवर तुमचा अनधिकृत कब्जा आहे. ही १३ दशांश जमीन लवकरात लवकर विद्यापीठाकडे सुपूर्द करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे प्रवक्ते महुआ बॅनर्जी यांनी सांगितले की, अमर्त्य सेन यांचे वडील आशुतोष सेन यांनी 1943 मध्ये विद्यापीठाकडून 125 दशांश जमीन भाडेतत्त्वावर घेतली होती.

सेन यांचा कुलगुरूंच्या भूमिकेबद्दल खेद : भारतरत्न अमर्त्य सेन यांनी नुकत्याच ईटीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीत विश्व भारतीच्या विद्यमान कुलगुरूंच्या भूमिकेबद्दल खेद व्यक्त केला होता. त्यानंतर विश्व भारती प्रशासनाने पुन्हा जमीन परत करण्याची मागणी केली. एका पत्रात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी अमर्त्य सेन यांना भूमापनाची ऑफरही दिली होती. अमर्त्य सेन यांचे आजोबा पंडित खितीमोहन सेन हे विश्व भारतीच्या स्थापनेतील कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या साथीदारांपैकी एक होते. त्यावेळी कविगुरूंनीच त्यांना शांतीनिकेतनमध्ये राहण्यासाठी जागा दिली होती.

या आधीही आरोप झाला आहे : शांतिनिकेतनच्या या 'प्रतिची' घरात क्षितिमोहन सेन राहत असत. पुढे त्यांचा मुलगा आशुतोष सेन तिथे राहू लागला, आणि आता नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन तेथे राहतात. असे म्हणतात की नोबेल पारितोषिक विजेते सेन यांना 'अमर्त्य' हे नाव खुद्द कवी रवींद्रनाथ टागोर यांनी या घरातच दिले होते. विश्व भारतीचे विद्यमान कुलगुरू विद्युत चक्रवर्ती यांनी एकदा अमर्त्य सेन यांच्यावर विद्यापीठाची जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. याचा देशभरातून निषेध करण्यात आला होता. प्रख्यात शिक्षणतज्ज्ञांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत ममता बॅनर्जी यांनीही याबाबत दु:ख व्यक्त केले होते.

कुलगुरूंवर टीका केली होती : जमीन हडपल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी अमर्त्य सेन यांनी त्यांच्या वकिलामार्फत विश्व भारतीच्या अधिकाऱ्यांना पत्रही लिहिले होते. या वादा संदर्भात विश्व भारतीचे कुलगुरू अमर्त्य सेन यांच्याबद्दल अनेकदा विविध टिप्पणी करताना ऐकायला मिळाले. शांती निकेतन येथील त्यांच्या घरी सोमवारी ईटीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीत अमर्त्य सेन यांनी विश्व भारतीतील शिक्षणाच्या दर्जाबाबत उत्साह व्यक्त केला. याशिवाय क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्यांच्या निलंबनाबाबत कुलगुरू आणि विश्वभारती अधिकाऱ्यांच्या वागणुकीवर टीका केली होती. या टीकेनंतर दुसऱ्याच दिवशी विश्व भारतीने त्यांना पुन्हा नोटीस पाठवली आहे.

हेही वाचा :Anil Antony Quits Congress : काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनीने दिला पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा

ABOUT THE AUTHOR

...view details