तिरुनेलवेली (तामिळनाडू) Blind Man Farming : एका दृष्टीहीन व्यक्तीनं व्यंगत्वावर मात करत, शेती व्यवसाय केलाय. मुरुगेसन असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. तो पंधरा वर्षाचा असताना त्याची दृष्टी गेली. तेव्हा त्यानं आईचा हात धरून खचून न जाता शेती करण्याचा निर्णय घेतला. शहरी जीवनापासून दूर असलेल्या रमणीय जंगलात राहून, मुरुगेसन सकाळी लवकर उठून शेतात आपल्या दिनक्रमाची सुरुवात करतो. तो अर्धा एकर शेतजमिनीत टॅपिओका, केळी उगवतो. शेतात त्यांची एक छोटी झोपडी देखील आहे. लहानपणी दोन्ही डोळ्यांची दृष्टी कमी झाल्यानं त्यावर मात करीत उत्तम शेतीचा मार्ग मुरुगेसननं निवडलाय.
जंगलातील दुर्गम भागात वस्ती : पेरिया मैलार हे तिरुनेलवेली जिल्ह्याच्या पश्चिम घाटातील लहान गाव आहे. येथे मोठ्या पर्वतरांगा, घनदाड जंगल आहे. तसेच या जंगलात वाघ, बिबट्या, अस्वल, हरीण यासारखे प्राणी आहेत. या प्राण्यांचं येथे वारंवार दर्शनं होतं. या हिरव्यागार नैसर्गिक अधिवासात वसलेल्या, पेरिया मैलार गावात 400 लोकसंख्या आहे. या जिल्ह्यातील बहुतांश वाडे घनदाट जंगलातील दुर्गम भागात आहेत. येथे गाडी फक्त करैयार धरणापर्यंत जाते. तिथून पुढं 4 किमी लांब धरण ओलांडल्यानंतर इंजिकुझीला जाण्यासाठी 10 किमी चालावं लागतं. तेथून पेरिया मैलारला जाण्यासाठी परत 6 किमी अंतर चालावं लागतं. अशा या घनदाट जंगलात हा तरुण शेती करतोय.
मुरुगेसनला लागली शेतीची गोडी : येथे राहणाऱ्या जमाती दळणवळणाच्या सुविधांपासून वंचित आहेत. वाहतुकीच्या सुविधांचा अभाव, घनदाट जंगल, प्राण्यांचा वावर यामुळं बहुतेक कुटुंबांना धरणाशेजारील भागात यावं लागतं. दुर्गम खेड्यात राहणारी 158 कुटुंबे दर आठवड्याला रेशन मिळवण्यासाठी,लांब पल्ल्याचा प्रवास करतात. वडील नसल्यानं त्याच्या आईनं त्याला वाढवलं. त्यानं सुरुवातीला आपल्या आईला मदत करण्यासाठी शेतीत हातभार लावला, मात्र, नंतर त्याला शेतीची गोडी लागली. त्यानंतर तो शेती आवड म्हणून करू लागला.