महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नारायण राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाखांचे बक्षिस - विश्व हिंदू सेना अध्यक्ष अरूण पाठक

विश्व हिंदू सेनेचे अध्यक्ष अरुण पाठक यांनी नारायण राणे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. त्यांनी राणेंना धमकी दिली आहे. तसेच, राणेंचे शीर धडावेगळे करणाऱ्याला 51 लाख रुपयांचे बक्षिसही अरुण पाठक यांनी जाहीर केले आहे. पाठक हे शिवसैनिक होते.

विश्व हिंदू सेना अध्यक्ष अरूण पाठक
विश्व हिंदू सेना अध्यक्ष अरूण पाठक

By

Published : Aug 26, 2021, 9:55 AM IST

वाराणसी : विश्व हिंदू सेनेचे अध्यक्ष अरुण पाठक (Vishwa Hindu Sena President Arun Pathak) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane) यांचा शिरच्छेद (Decapitation) करणाऱ्याला 51 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बनारसच्या भेलूपूर भागात राहणाऱ्या अरुण पाठक यांनी फेसबुक आणि ट्विटरवर नारायण राणेंविरोधात अनेक आक्षेपार्ह पोस्टही केल्या आहेत.

कोण आहेत अरुण पाठक?

अरुण पाठक हे पहिले शिवसैनिक होते. महाराष्ट्रात काँग्रेसशी (Congress) युती केल्यानंतर त्यांनी शिवसेना (shiva sena) सोडली आणि विश्व हिंदू सेना (Vishwa Hindu Sena) स्थापन केली. यापूर्वी अरुण पाठक प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा एका नेपाळी तरुणाचे गंगेच्या काठावर मुंडन केले होते. त्याला जय श्री राम (Jay Shri Ram) अशी घोषणा द्यायला लावल्या होत्या. शिवाय, त्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्या प्रकरणातही पोलिसांनी अरुण पाठकचे मुख्य आरोपी म्हणून नाव नोंदवले आणि गुन्हा दाखल केला होता. सध्याही पोलीस तीन प्रकरणांमध्ये अरुण पाठकचा शोध घेत आहेत.

नारायण राणे कृतघ्न, पॉकेटमार - अरुण पाठक

अरुण पाठक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. त्यांनी आपल्या फेसबुकवर लिहिले आहे, की "पॉकेटमार आणि ब्लॅकने तिकीट विकणाऱ्या नारायण राणेला बाळासाहेबांनी दयाळूपणे शिवसैनिक बनवले. त्याला मुख्यमंत्रीही बनवले. मात्र त्यानेच एक घृणास्पद काम केले आहे. स्वस्त लोकप्रियता मिळवण्यासाठी बाळासाहेबांच्या मुलावर (उद्धव ठाकरे) त्याने हल्ला केला. त्यामुळे अशा माणसाचे डोके कापले पाहिजे. जो हे काम करेल, त्याला 51 लाख रुपये बक्षिस देईन"

यासोबतच अरुण पाठक यांनी ट्विटर अकाऊंटवरही राणेंसंदर्भात आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. "कृतघ्न नारायण राणे मी तुला वचन देतो, की तू मेल्यानंतर तुझ्या अस्थी काशीमध्ये विसर्जित करु देणार नाही. तुझा आत्मा शतकानुशतके भटकत राहील", अशी पोस्ट पाठक यांनी ट्विटरवर केली आहे.

अरुण पाठक कट्टर हिंदू व बाळासाहेबांचे भक्त

वाराणसीच्या भेलूपूर भागात राहणारे अरुण पाठक पूर्वी शिवसेनेचे नेते होते. ते मुंबईला (Mumbai) जात असत. ठाकरे कुटुंबाबद्दल (Thackeray Family) त्यांना खूप आदर होता. ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे अनन्य भक्त आणि कट्टर हिंदू मानत होते. महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेसने सरकार स्थापन केले, तेव्हा अरुण पाठक यांनी त्याला विरोध केला होता. यानंतर त्यांनी विश्व हिंदू सेना नावाची स्वतंत्र संघटना स्थापन केली.

नेपाळी तरुणाच्या मुंडन प्रकरणात फरार अरुण पाठक

16 जुलै 2020 रोजी नेपाळचे राष्ट्रपती (Nepal President) यांनी अयोध्या (Ayodhya) आणि श्री राम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध अरुण पाठक यांनी केला होता. त्यामुळे त्यावेळी अनेकांनी मिळून गंगेच्या तीरावर जल संस्थान वाराणसीमध्ये राहणाऱ्या एका नेपाळी युवकाचे मुंडन केले होते. त्याच्याकडून जय श्री रामचे नारे वदवून घेतले होते. या घटनेपासून जागतिक हिंदू संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण पाठक फरार आहेत.

म्हणून पाठक यांनी ठेवलेय 51 लाखांचे बक्षिस

नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल (About CM Uddhav Thackeray) खालच्या थराला जाऊन वक्तव्य केले. यामुळ संपूर्ण महाराष्ट्रात तणावाचा वातावरण पाहायला मिळाले. राणेंच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी राणेंच्या विरोधात आंदोलन, निषेध, जाळपोळ करण्यात आली. काही शिवसैनिकांनी राणेंच्या मुंबईतील घरावर दगडफेकही केली. काही ठिकाणी भाजप ऑफिसवर हल्ला करण्यात आले. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांच्यात तुफान हाणामारी झाली. राणेंच्या या वक्तव्याचा देशभरातूनही निषेध करण्यात आला. आता अरुण पाठक यांनीही राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. इतकेच नव्हे तर राणेंना धमकी दिली आहे. त्यांचे शीर धडावेगळे करणाऱ्याला 51 लाख रुपयाचे बक्षिसही जाहीर केले आहे.

नक्की काय म्हणाले राणे?

'देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही', असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details