प्रयागराज - उत्तर प्रदेशमधील प्रयागराज जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून साधु-संतांनी राम मंदिराच्या निर्मितीसाठी प्रत्येक हिंदूने आपला सहभाग नोंदवला पाहिजे, असे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक हिंदूच्या घरातून कमीत कमी 10 रुपये मदत निधी गोळा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी तीन सदस्य असलेले एक लाख गट बनविण्यात येणार आहेत. ते देशभर फिरून निधी गोळा करणार आहेत.
या निधी संकलनासाठी तीन बँकासोबत करार-
तीन सदस्यांचा गटाकडून राम मंदिरासाठी जमा करण्यात येणार निधी जनतेकडून गोळा केलेल्या दुसऱ्या दिवशीच बँकेत जमा करण्यात येणार आहे. या साठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या सोबत सामजस्य करार करण्यात आले आहेत. ज्यामुळे तब्बल 46 हजार बँक शाखांमधून हा निधी मंदिराच्या कामासाठी जमा करता येणार आहे.
राम मंदिरासाठी प्रत्येक हिंदू कुटुंबाने निधी दान करावा बँककेच्या माध्यमातून राम मंदिर निर्माणच्या कामासाठी जमा करण्यात येणारा निधीसाठी एक स्वतंत्र पावती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या माध्यमातून हे कार्यकर्ते स्वत:ची माहिती भरून तो निधी थेट मंदिर समितीच्या खात्यात जमा करतील. देशभरातून मिळणाऱ्या या निधीच्या हिशोबासाठी राम मंदिर ट्रस्टच्या वतीनेही तयारी करण्यात आली आहे. त्यामध्ये १५ संगणाकावर 15 अकाउंटंट नेमण्यात आले आहेत. ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पोलिओ निर्मुलन करण्यासाठी ज्या पद्धतीने अभियान राबविण्यात येते. त्या प्रमाणे मंदिर निधी गोळा करणारे पथक काम करणार आहे. जवळपास ५५ लाख हिंदू घरापर्यंत पोहोचून हा निधी गोळा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रामनवमीला सूर्यकिरणे मूर्तीवर-
मंदिर निर्मिती होईल त्यावेळी प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकाची संख्या मोठ्या प्रमाणात राहणार आहे. त्यावेळी सर्वांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेणे शक्य होणार नाही. त्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रांगणात एलसीडी लावण्यात येणार असल्याची योजना आखण्यात आली आहे. तसेच रामनवमीच्या दिवशी सुर्यकिरणे प्रभू रामाच्या मूर्तीवर पडतील अशी व्यवस्था करण्यासाठी स्थापत्य कलेतील तज्ञांचा सल्ला घेतला जात आहे.