सूरत (गुजरात) - वेसू भागातील महावीर कॉलेजमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. (Vishva Hindu Parishad in Surat). येथे एका अहिंदू महाविद्यालयीन विद्यार्थ्याने एका हिंदू मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. आधी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यावर हल्ला केला. त्यानंतर अचानक एका मोठ्या टोळक्याने येऊन त्या तरुणावर हल्ला केला. (Vishva Hindu Parishad protested in college). (Vishva Hindu Parishad on love jihad).
Love Jihad : तथाकथीत लव्ह जिहाद प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचा कॉलेजमध्ये राडा - विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला
या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश नवदिया म्हणाले, "सर्वप्रथम, मी याला हल्ला म्हणणार नाही. हा केवळ स्वसंरक्षणासाठी केलेला उपाय आहे. लव्ह जिहाद चळवळ भारतभर पसरत आहे. भारतात, मागील वर्षी सुमारे 20 हिंदू मुलींना आत्महत्या करावी लागली आहे." (Vishva Hindu Parishad on love jihad) (Vishva Hindu Parishad in Surat).

विश्व हिंदू परिषदेचे विधान - या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश नवदिया म्हणाले, "सर्वप्रथम, मी याला हल्ला म्हणणार नाही. हा केवळ स्वसंरक्षणासाठी केलेला उपाय आहे. लव्ह जिहाद चळवळ भारतभर पसरत आहे. भारतात, मागील वर्षी सुमारे 20 हिंदू मुलींना आत्महत्या करावी लागली आहे. तसेच दिल्लीच्या श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण हिंदू समाज खवळला आहे." ते पुढे म्हणाले की, "विश्व हिंदू परिषदेने सुरतमधील महावीर कॉलेजमध्ये एका मोठ्या कटाबद्दल ऐकले आहे. ही माहिती अचूक आहे की नाही? यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी दोन दिवस शोध घेतला. त्या दरम्यान त्यांना या कॅम्पसमध्ये लव्ह जिहादचा मोठा कट रचला जात असल्याचे आढळून आले आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुलींच्या संरक्षणासाठी ही कारवाई केली आहे. आगामी काळात लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या समस्येचा सामना करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आपली सर्व शक्ती वापरेल," असेही ते म्हणाले.