मुंबई - भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने Virat Kohli प्रसिद्ध गायक किशोर कुमार singer Kishore Kumar's यांच्या गौरी कुंज Gouri Kunj या बंगल्याचा भाग त्याच्या मालकीच्या रेस्टॉरंट चेनमध्ये जोडण्यासाठी भाड्याने घेतला आहे, असे मीडिया रिपोर्ट्सने शुक्रवारी सांगितले. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार Amit Kumar यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. कोहली लवकरच अमित कुमार यांच्या मालकीच्या बंगल्यात एक रेस्टॉरंट सुरू करणार आहे.
अमित कुमार यांनी एका मीडिया आउटलेटला सांगितले की, "आम्ही विराटला 5 वर्षांसाठी जागा भाड्याने दिली आहे." हा बंगला जुहू येथे आहे आणि क्रिकेटर त्याचा वापर त्याच्या रेस्टॉरंट्सच्या चेनचा एक भाग म्हणून करणार आहे. वन8 कम्यून ही विराट कोहलीची रेस्टॉरंट्सच्या चेन असून याचे नाव विराटच्या जर्सी क्रमांकावरुन घेण्यात आले आहे. किशोर कुमारचा मुलगा अमित यानेही काही महिन्यांपूर्वी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला आहे. दरम्यान, कंपनीच्या इंस्टाग्राम बायोमध्ये "Juhu, Mumbai #ComingSoon" असे लिहिण्यात आले आहे. विराट कोहलीच्या रेस्टॉरंट चेनचे दिल्ली, कोलकाता आणि पुणे येथे विविध फूड आउटलेट आहेत.