दुबई:भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Former captain Virat Kohli ) पुन्हा एकदा जुन्या फॉर्ममध्ये दिसत आहे. कोहलीने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71 वे शतक झळकावले आहे. त्याचबरोबर संपूर्ण आशिया चषक स्पर्धेतही त्याने आपली उपस्थिती कायम ठेवली होती. यामुळे कोहलीला आयसीसी टी-20 क्रमवारीत बंपर फायदा ( Kohli gains in ICC T20 rankings ) झाला आहे. त्याने 14 स्थानांनी झेप ( Virat Kohli rises 14 spots ) घेत 15व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. कोहलीने अलीकडेच आशिया चषक स्पर्धेत एकूण 276 धावा केल्या होत्या.
त्याने त्याच्या करिअरमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये पहिले शतक ( Virat first century in T20I ) झळकावले. कोहलीने हे शतक आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा तो संयुक्त दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे.
सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर -
जर फलंदाजीच्या क्रमवारीबद्दल बोलायचे तर या टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर ( Suryakumar Yadav ranked 4th in T20 rankings ) आहे. तर कर्णधार रोहित शर्मा 14 व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच कोहली आता फक्त रोहितच्या मागे आहे. आशिया कपमध्ये उत्कृष्ट फॉर्म दाखवणारा पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान अव्वल स्थानावर आहे.
भुवनेश्वर कुमारला 4 स्थानांचा फायदा -