मोहाली :भारतीय कर्णधार रोहित शर्माने ( Captain Rohit Sharma) रविवारी सांगितले की, विराट कोहली ( Star Batter Virat Kohli ) हा त्याच्यासोबत डावाची सुरुवात करण्याचा पर्याय आहे. त्याचवेळी, पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात केएल राहुल ( Batter KL Rahul ) त्याचा सलामीचा जोडीदार असेल, असे स्पष्ट करण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी रोहितने मीडियाला सांगितले की, संघ व्यवस्थापन प्रत्येक खेळाडूच्या भूमिकेबाबत स्पष्ट ( Rohit sharma press conference ) आहे.
विराट आमचा तिसरा सलामीवीर -
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर, भारत तीन सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवेल आणि त्यानंतर टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. रोहित शर्मा म्हणाला, "राहुल भाय ( Head coach Rahul Dravid ) आणि माझे बोलणे झाले की, आपण विराटला काही सामन्यांमध्ये डावाची सुरुवात करु द्यावी. कारण तो आमचा तिसरा सलामीवीर आहे," असे रोहितने या महिन्याच्या सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्धच्या आशिया चषकात कोहलीच्या शतकाच्या संदर्भात सांगितले. गेल्या सामन्यात त्याने सलामीवीर म्हणून काय केले ते आम्ही पाहिले आणि आम्ही त्याच्या कामगिरीवर खूप आनंदी आहोत.
आम्ही या जागेवर जास्त प्रयोग करणार नाही -
नोव्हेंबर 2019 नंतर कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिले शतक होते आणि एकूण 71 वे शतक होते. कोहलीला तिसरा सलामीवीर म्हणण्यासोबतच रोहितने राहुल आपला सलामीचा जोडीदार राहणार असल्याचे स्पष्ट केले. तो म्हणाला, टी-20 विश्वचषकात केएल राहुल आमच्यासाठी डावाची सुरुवात करेल. आम्ही या जागेवर जास्त प्रयोग करणार नाही. त्याच्या कामगिरीवर अनेकदा लक्ष ठेवले जाते. तो भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे.
राहुलच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित -
भारतीय कर्णधार म्हणाला, गेल्या दोन-तीन वर्षातील त्याची कामगिरी पाहिली तर खूप चांगली झाली राहिली आहे. मला प्रत्येकाला हे स्पष्ट करायचे आहे की, यावर आमचे स्पष्ट मत आहे आणि बाहेर काय शिजवले जाते, हे आम्हाला चांगले माहित आहे. राहुलच्या स्ट्राईक रेटवर गेल्या काही काळापासून प्रश्न उपस्थित ( Questions on Rahul strike rate ) केले जात होते आणि आता कोहली फॉर्ममध्ये परतल्याने त्याने रोहितसोबत डावाची सलामी करायची की नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. राहुल आपल्यासाठी काय करू शकतो हे स्पष्ट आहे. तो आमच्यासाठी मॅचविनरही आहे. आम्ही तिसरा सलामीवीर घेतला नाही आणि विराट आमच्यासाठी डावाची सुरुवात करू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो त्याच्या आयपीएल फ्रँचायझीसाठी हे करत आहे.
हेही वाचा -Virat Kohli New Hairstyle : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी किंग कोहली दिसला एका नव्या हेअरस्टाईलमध्ये