महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Viral Video of Injured Monkey : अहो आश्चर्यम! पिल्लासह माकड उपचाराकरिता दवाखान्यात दाखल, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की रोहतासमध्ये माकड उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये (Monkey Reached Hospital For Treatment In Rohtas)  पोहोचले आहे. तिच्या छातीवर तिच्या पिल्लाला घेऊन खुर्चीवर बसले (Rohtas Viral Video) आहे. डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. साधारणपणे माकडाला कोणी हात लावला तर तो चिडतो. मात्र या माकडाने खुर्चीत आरामात बसून स्वत:वर आणि मुलावर डॉक्टरांकडून उपचार करून घेतले.

पिल्लासह माकड उपचाराकरिता दवाखान्यात दाखल
पिल्लासह माकड उपचाराकरिता दवाखान्यात दाखल

By

Published : Jun 8, 2022, 7:08 PM IST

Updated : Jun 8, 2022, 8:26 PM IST

रोहतास- जिल्ह्यातील स्थानिक शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहजुमा परिसरात असलेल्या एका क्लिनिकमध्ये मंगळवारी लोकांची गर्दी जमली होती. पिल्लाला पाहण्यासाठी माकडाची आई आली होती. प्रत्यक्षात कुठूनतरी पडल्यामुळे माकड आणि तिचे पिल्ले जखमी झाले. त्यानंतर माकडाने आपल्या पिल्लाला उपचारासाठी रुग्णालयात नेले (Viral Video Of Injured Monkey Reached Hospital) हे प्रकरण डॉ. एस.एम. अहमद (Treatment Of Monkey In Doctor SM Ahmed Clinic) यांच्या खासगी क्लिनिकमधील आहे.

जखमी माकड पोहोचले रुग्णालयात - व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की रोहतासमध्ये माकड उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये (Monkey Reached Hospital For Treatment In Rohtas) पोहोचले आहे. तिच्या छातीवर तिच्या पिल्लाला घेऊन खुर्चीवर बसले (Rohtas Viral Video) आहे. डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. साधारणपणे माकडाला कोणी हात लावला तर तो चिडतो. मात्र या माकडाने खुर्चीत आरामात बसून स्वत:वर आणि मुलावर डॉक्टरांकडून उपचार करून घेतले. त्यांच्या या वागणुकीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पिल्लासह माकड उपचाराकरिता दवाखान्यात दाखल

माकडाची बुद्धी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले - माकडाची समजूत पाहून लोक आश्चर्यचकित झाले. याची आजूबाजूच्या परिसरात चर्चा झाली. या माकडाची आणि तिच्या पिल्लाची एक झलक घेण्यासाठी सर्वजण दवाखान्याजवळ जाऊ लागले. यावेळी काही लोकांनी त्याचा व्हिडिओही बनविला. डॉक्टरांनी दोघांवर उपचार करून त्यांना बाहेर पाठवले. बाहेर गेल्यानंतर लोकांनी तिचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही.

माकडाला स्वत:वर आणि पिल्लावर उपचार करण्यासाठी डॉक्टर मिळाला - माकडाच्या आईची अशी सभ्य वागणूक पाहून डॉक्टरही अवाक् झाले. डॉक्टरांनी सांगितले की जखमी माकड त्यांच्या दवाखान्यासमोर येऊन बसले. त्यानंतर डॉक्टरांना मदतीची गरज असल्याचे समजले. डॉक्टरांनी धाडस करून माकडाला आत बोलावले. माकड ताबडतोब आपल्या मुलाला घेऊन क्लिनिकमध्ये आले. रुग्णाप्रमाणे डॉक्टरांच्या शेजारी बसलेल्या स्टूलवर बसले. त्यानंतर डॉक्टरांनी जखमी माकडाच्या पिल्लाची जखम स्वच्छ करण्यासाठी मलमपट्टी काढली. यादरम्यान माकड डॉक्टरांकडे टक लावून पाहत राहिले. डॉक्टरांनी पिल्लावर उपचार सुरू केले. पण माकडाने आपल्या पिल्लाला क्षणभरही स्वतःपासून वेगळे होऊ दिले नाही. डॉक्टरांनी पिल्लावर उपचार केले. त्यानंतर माकडाने स्वत:वर उपचार करून घेतले.

हेही वाचा-MSP 'Approved: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! खरीप पिकांच्या MSP'ला दिली मंजूरी

हेही वाचा-Paperman of India : ओडिशातील साशा दासचा वर्तमानपत्र गोळा करून विश्वविक्रम
हेही वाचा-Afghanistan Child Trafficking: तालिबान राजवटीत संकट! पोट भरण्यासाठी मुलं मृत्यूशी खेळायेत

Last Updated : Jun 8, 2022, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details