वैशाली (बिहार) : बिहारच्या वैशालीमध्ये घरासमोर उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक स्कूटीचा जोरदार स्फोट झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्कूटीतून आधी धूर निघत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर काही मिनिटांनी स्फोट झाला. व्हायरल व्हिडिओ वैशाली जिल्ह्यातील दिघी पूर्वी इथला आहे. (Explosion In Electric Scooter)
स्कूटीमध्ये बॅटरीत होता बिघाड : ही स्कूटी हाजीपूर दिवाणी न्यायालयातील वकील अभिनय कौशल यांची आहे. त्यांनी एका वर्षापूर्वी ८५,००० रुपयाला ही स्कूटी खरेदी केली होती. मात्र तेव्हापासून स्कूटीमध्ये बॅटरीत बिघाड होता. याबाबत त्यांनी कंपनीकडे तक्रार केली असता कंपनीने त्यांना अनेकवेळा रोटेशनल बॅटरी बदलून दिली होती. ही घटना घडण्याच्या ३ दिवस आधीच त्यांनी बॅटरी बदलून आणली होती.
एका वर्षापासून स्कूटीच्या बॅटरीची समस्या होती. शोरूमवाले प्रत्येक वेळेस बॅटरी बदलून रोटेशनल बॅटरी द्यायचे. 3 दिवसांपूर्वीच बॅटरी बदलली होती. मी बॅटरी आणून माझ्या स्कूटीमध्ये बसवली. सकाळी ती घेऊन मी कोर्टात गेलो. कोर्टातून परत आल्यानंतर स्कूटी दारात उभी होती. संध्याकाळी स्कूटीतून अचानक धूर येऊ लागला आणि त्यानंतर तिने पेट घेतला. - अभिनय कौशल, स्कूटीचे मालक