हैदराबाद-ऑडी व रिक्षाच्या अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.भरधाव वेगाने जाणाऱ्या ऑडीच्या धडकेने रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा अपघात हैदराबादमधील माधपूरमध्ये सोमवारी घडला आहे.
ऑडीचा मालक सुजीत रेड्डी आणि आशिष यांनी रायदुर्गममध्ये मित्रांच्या घरी रात्री रविवारी जेवण केले. त्यानंतर मद्यप्राशन केले. सुजीत रेड्डी याने भरधाव वेगातील ऑडीने रस्त्यातील रिक्षाला पाठीमागून जोरात धडक दिली. हा अपघात माईहोम अब्रा येथे घडला आहे.
भरधाव ऑडीच्या धडकेत रिक्षा गेली फरफटत हेही वाचा-ह्रदयद्रावक : कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींची आत्महत्या
खेळण्याप्रमाणे रिक्षा अपघातानंतर फरफटत गेली-
ही धडक एवढी जोरात होती की रिक्षा पलटी झाली होती. खेळण्याप्रमाणे रिक्षा अपघातानंतर फरफटत गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. रिक्षातील प्रवाशाचा जागेवरच मृत्यू झाला. तर रिक्षा चालक जखमी झाला आहे. अपघातानंतर सुजीत आणि आशिष हे घटनास्थळावरून पळून गेले. त्यांनी कारच्या नंबर प्लेटही काढून टाकून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, सीसीटीव्हीमुळे त्यांच्या प्रयत्नावर पाणी फिरले.
हेही वाचा-मॉर्डना लस भारतात लवकरच होणार दाखल; केंद्राने सिप्लाला आयातीची दिली परवानगी
आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीमुळे फसला-
आरोपी सुजितच्या वडिलांनी दुसऱ्या एका चालकाला घेऊन पोलिसांकडे धाव घेतली. मुलाने नव्हेच दुसऱ्या चालकाने अपघात केल्याची पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीसीटीव्ही फुटे पाहिल्यांतर पोलिसांना सत्य परिस्थिती कळाली. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सायबराबाद पोलिसांनी अपघाताचे फुटेज ट्विटरवरच्या अकाउंटवर ट्विट केले आहे.