महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

धडकी भरविणारा अपघात! चेकपोस्ट टाळण्यासाठी पळवली दुचाकी; एकाचा जागीच मृत्यू - Telangana checkpost accident

तेलंगणातील मंचेरिअल जिल्ह्यातला धडकी भरवणाऱ्या अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चेकपोस्ट टाळण्यासाठी दुचाकी भरधाव वेगानं पळवणं दोन तरुणांना महागात पडलं आहे. यात एकाचा जागीच मृत्यू झाला.

तेलंगणा
तेलंगणा

By

Published : May 24, 2021, 8:20 PM IST

नवी दिल्ली - चेकपोस्ट टाळण्यासाठी दुचाकी भरधाव वेगानं पळवणं दोन तरुणांना महागात पडलं आहे. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. धडकी भरवणारा हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तेलंगणातील मंचेरिअल जिल्ह्यात ही घटना घडली.

धडकी भरविणारा अपघात

दोन तरुणांना भरधाव वेगाने येताना पाहून चेकपोस्टवरील कर्मचाऱ्याने त्यांना हातवारे करून थांबवण्याची सूचना केली. मात्र, त्याकडे तरुणांनी दुर्लक्ष केले आणि चेकपोस्टवर थांबावे लागू नये. म्हणून दोन तरूणांनी भरधाव वेगाने दुचाकी पळवली. तरुणांनी दुचाकीचा वेग कमी केला नसल्याचे लक्षात येताच, चेकपोस्टवरील कर्मचाऱ्याने बॅरिकेडला तरूण धडकू नये म्हणून बॅरिकेड शक्य तितक्या लवकर वरती नेण्याचा प्रयत्न केला.

चेकपोस्टजवळ पोहचात दुचाकी चालवत असलेल्याने मान खाली झुकवली आणि धडक टाळली. मात्र, त्याच्या मागे बसेल्या व्यक्तीनेही तसेच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा अंदाज चुकला आणि तो बॅरिकेडला धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की तो दुचाकीवरून उडाला आणि धाडकन खाली आपटला. यात त्यांच्या गंभीर मार लागला आणि त्याने जागीच प्राण सोडले. सुदावेनी व्यंकटेश गौड अशी मृत तरूणाची ओळख आहे. तर दुचाकी चालवत असलेला तरूणाचं नाव बंडी चंद्रशेखर आहे. दुचाकी चालवणाऱ्याने जर गाडी थांबवली असती तर असा दुर्देवी अपघात झाला नसता.

ABOUT THE AUTHOR

...view details