शिवपुरी (उत्तर प्रदेश) :शिवपुरीमध्ये महिलेवर दोन जणांनी अत्याचार केल्याची घटना (Violence against women) घडली. शेतात काम करत असताना आरोपींनी महिलेच्या प्रायव्हेट पार्ट व शरीरावर अंगावर गरम चिमट्याने चटका (accused burnt woman body parts with tongs) दिला. व गोळी झाडून पळ काढला. महिलेला शिवपुरी येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेदरम्यान आरोपींची ओळख पटू शकली नाही. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
धक्कादायक घटना :शिवपुरी जिल्ह्यातील एका 35 वर्षीय महिलेसोबत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मायापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडोरा गावात दोन अनोळखी व्यक्तींनी महिलेला पकडून तिचे डोळे बंद केले. तिचा चेहरा, गुप्तांग आणि शरीरावर जागोजागी गरम चिमट्याने चटके दिले. घटनेनंतर आरोपी महिलेला वेदनेने सोडून पळून गेला. नातेवाइकांनी गंभीर अवस्थेत महिलेला शिवपुरी येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. माहिती मिळताच पोलीसांनी वैद्यकीय महाविद्यालय गाठून महिलेचा जबाब नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू (accused burnt woman body parts) केला.