महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 12, 2022, 4:47 PM IST

ETV Bharat / bharat

Code of Conduct Violation : पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीमुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला नाही का? काँग्रेसचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( Prime Minister Narendra Modi's interview ) एएनआयला मुलाखत दिली होती. या मुलाखतीवर काँग्रेसने ( Congress questions PM Modi's interview ) आक्षेप घेतला आहे. या मुलाखतीतून आदर्श आचारसंहितेचे ( Model Code of Conduct ) उल्लंघन कसे झाले नाही, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

PM Modi
पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली -उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 10 फेब्रुवरी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( Prime Minister Narendra Modi's interview ) एएनआयला मुलाखत दिली होती. या मुलाखतीवर काँग्रेसने ( Congress questions PM Modi's interview ) आक्षेप घेतला आहे. या मुलाखतीतून आदर्श आचारसंहितेचे ( Model Code of Conduct ) उल्लंघन कसे झाले नाही, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याच्या आधी मुलाखत प्रसारित करण्याची परवानगी दिल्याबद्दल काँग्रेसने भारतीय निवडणूक आयोगावर (ECI) गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात निवडणुकीपूर्वी काही माध्यम वाहिन्यांनी मुलाखत दिली होती. तेव्हा त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, असे ईटीव्ही भारतशी बोलताना, राज्यसभा सदस्य आणि काँग्रेसचे प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल राज्य यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी बुधवारी योगी आदित्यनाथ सरकारच्या कामांचा उल्लेख केला. निवडणुकीच्या काळात प्रत्येक नेता आपापली वैचारिक मते मांडतो. पण पंतप्रधान असल्याने तुमच्यावर एक प्रकारची जबाबदारी असते. आजपर्यंत एकाही पक्षाच्या पंतप्रधानाने निवडणूक भाषणे केली नाहीत, जुमलाही दिलेला नाही. पंतप्रधान मोदींनी देशाशी संबंधित एकही मुद्दा उपस्थित केला नाही, असे काँग्रेस खासदार म्हणाले.

मोदींची मुलाखत...

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सविस्तर मुलाखत दिली होती. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचही राज्यात भाजपाची लाट असल्याचा दावा करत विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. त्याचबरोबर उत्तर प्रदेश सरकार आणि योगी आदित्यनाथ यांच्या योजना आणि कार्याचा गौरवरही पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत केला होता.

हेही वाचा -'आचारसंहिता' म्हणजे नेमकं आहे तरी काय ?

ABOUT THE AUTHOR

...view details