प्रतापगढ -कोरोना संकटकाळापासून वाचण्यासाठी लोक आता औषधे आणि भक्तीच्या मार्गाचा अवलंब करायला लागले आहेत. प्रतापगढच्या सांगीपूरमध्ये जुही शुक्लपूर गावात कोरोनाला हरवण्यासाठी गावकऱ्यांनी कोरोना मातेचे मंदिर बांधले आहे. या मंदिरात कोरोना मातेचा मास्क लावून मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सर्व गावकरी कोरोना मातेची विधीवत पूजाअर्चा करत आहेत. असे केल्यास, त्यांच्या गावात कोरोना पसरणार नाही, अशी त्यांची श्रध्दा आहे. दरम्यान, आता स्थानिक प्रशासनाने कोरोना मातेचे हे मंदिर पाडले आहे. जागेचा वाद झाल्याने प्रशासनाने या मंदिरावर कारवाई केली असल्याची माहिती आहे.
कोरोनामुळे तीन मृत्यू झाल्याने मूर्तीची स्थापना
सांगीपूरच्या जुही शुक्लपूर गावात कोरोनामुळे तीन लोकांचा मृत्यू झाल्याने गावकरी अतिशय घाबरले. यानंतर गावातील लोकेश श्रीवास्तवने सांगितल्यानुसार त्यांनी पैसे गोळा करून ७ जूनला कोरोना मातेची मूर्ती स्थापना केली. खास लोकाग्रहास्तव तयार केलेल्या कोरोना माताची मूर्ती लिंबाच्या झाडाखाली त्याची स्थापना केली. त्याला कोरोना मातेचे नाव दिले. गावातील पूर्वजांनी कांजिण्यांना शीतळा देवीचे रुप मानले होते. आणि कोरोनाही त्याचे देवीचे रुप आहे, अशी त्यांची श्रध्दा आहे.
दूरवरून कोरोना माताच्या दर्शनासाठी गर्दी
गावकऱ्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी कोरोना माताच्या मूर्तीची स्थापना केली आहे. या कोरोना मातेच्या दर्शनासाठी दूरवरून लोक येत आहेत. तसेच या देवीची भक्तीभावाने पूजा करतानाही दिसत आहेत. गावकरी अगरबत्ती लावून तसेच प्रसाद अर्पण करत कोरोना मातेची पूजा करत आहे.