हैदराबाद : सुपरस्टार तमिळ अभिनेता विक्रमबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने अभिनेत्याला चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अलीकडेच, मणिरत्नन दिग्दर्शित 'पोनियिन सेल्वन पार्ट 1' या अभिनेत्याचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. मॅग्नम ओपस 'पोनियान सेल्वन पार्ट-1' मध्ये साऊथ सुपरस्टार विक्रम (South superstar Vikram) व्यतिरिक्त जयम रवी, कार्ती त्रिशा, सरथ कुमार, प्रकाश राज, शोभिता धुलिपाला, विक्रम प्रभू आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) मुख्य भूमिकेत आहेत.
Vikram Chiyan hospitalized: हृदयविकाराचा झटका आल्याने विक्रम चियान रुग्णालयात दाखल - Filmfare Award
सुपरस्टार तमिळ अभिनेता विक्रम यांना हृदयविकाराच्या झटका (vikram heart attack) आल्याने चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 56 वर्षीय अभिनेता 8 जुलै रोजी त्याच्या आगामी पिरियड फिल्म 'पोनियिन सेल्वन पार्ट 1'(ponniyin selvan part 1Trailer) च्या ट्रेलर लाँचला उपस्थित राहणार होता.
![Vikram Chiyan hospitalized: हृदयविकाराचा झटका आल्याने विक्रम चियान रुग्णालयात दाखल vikram chiyaan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15771822-thumbnail-3x2-vikr.jpg)
30 सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार पोनियिन सेल्वन पार्ट 1- हैदराबाद आणि मध्य प्रदेशसह देशभरातील विविध शहरांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आ मणिरत्नम अनेक दिवसांपासून या चित्रपटाची तयारी करत आहेत. हा चित्रपट या वर्षी 30 सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
विक्रम चियान विषयी थोडक्यात:विक्रम चियान त्याचे खरे नाव केनेडी जॉन व्हिक्टर आहे. त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. विक्रमने राष्ट्रीय पुरस्कारासह सात फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award), तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत.