महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Vijay Diwas 2021 : भारताच्या विजयानंतर जगाच्या नकाशावर झाला बांग्लादेशचा जन्म

बंगाली, मुस्लिम आणि हिंदूंना वाचवण्यासाठी भारत पाकिस्तानशी युद्ध करण्याचा भारत सरकारने 03 डिसेंबर 1971 रोजी निर्णय घेतला. हे युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये ( India-Pakistan War 1971 ) 13 दिवस चालले होते. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने 93 हजार सैनिकांसह भारतासमोर शरणागती पत्करली होती. भारतीय लष्कराचा ( Indian Army ) पाकिस्तानविरुद्धचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय होता.

Vijay Diwas 2021
Vijay Diwas 2021

By

Published : Dec 16, 2021, 12:43 AM IST

हैदराबाद -16 डिसेंबर हादिवस भारतात 'विजय दिवस' ( Vijay Diwas ) म्हणून साजरा केला जातो. भारताने केवळ या युध्दात भागच घेतला नाही तर पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांग्लादेशला स्वातंत्र्य केलं. तो दिवस होता 16 डिसेंबर 1971. या युध्दात भारताने पाकिस्तानचा पराभव ( India-Pakistan War 1971 ) केला आणि जगाच्या नकाशावर बांग्लादेशला जन्म दिला. बंगाली, मुस्लिम आणि हिंदूंना वाचवण्यासाठी भारत पाकिस्तानशी युद्ध करण्याचा भारत सरकारने 03 डिसेंबर 1971 रोजी निर्णय घेतला. हे युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये 13 दिवस चालले होते. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने 93 हजार सैनिकांसह भारतासमोर शरणागती पत्करली होती. भारतीय लष्कराचा पाकिस्तानविरुद्धचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय होता.

युद्धाचे कारण -

1971 पूर्वी बांगलादेश हा पाकिस्तानचा एक भाग होता, ज्याला 'पूर्व पाकिस्तान' ( East Pakistan ) म्हटले जात असे. पूर्व पाकिस्तानातील लोकांना मारहाण, शोषण, महिलांवर बलात्कार आणि पाकिस्तानी सैनिकांकडून लोकांची हत्या करण्यात आली. पाकिस्तानच्या छळाच्या विरोधात भारताने बांगलादेशला पाठिंबा दिला. पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे लष्करी शासक जनरल अयुब खान यांच्या विरोधात प्रचंड असंतोष होता. १६ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा (Lieutenant General Jagjit Singh Arora ) यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्कराला आत्मसमर्पण केले. हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या विजयानंतर बांगलादेश जगाच्या नकाशावर उदयास आला.

1971 च्या भारत-पाक युद्धाविषयी काही महत्त्वाचे तथ्य -

  1. हे युद्ध पूर्व पाकिस्तानातील ( Bangladesh ) लोकांशी होणारी गैरवर्तणूक आणि पाकिस्तानचे निवडणूक निकाल लक्षात घेऊन झाले. 26 मार्च 1971 रोजी पूर्व पाकिस्तानने अधिकृतपणे वेगळे होण्याचा आवाज उठवला.
  2. भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानी सैन्याच्या हातून बंगाली आणि हिंदूंची व्यापक हत्याकांडाची बातमी दिली होती, ज्यामुळे सुमारे 10 दशलक्ष लोकांना भारतात पळून जावे लागले. बंगाली निर्वासितांसाठी भारतानेही आपली सीमा खुली केली.
  3. उत्तर-पश्चिम भारताच्या हवाई क्षेत्रांवर पाकिस्तान हवाई दलाने (PAF) केलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारत-पाक युद्ध प्रभावीपणे सुरू झाले. त्याला प्रत्युत्तर देत भारतीय हवाई दलाने पश्चिम आघाडीवर सुमारे चार हजार लढाऊ विमाने आणि पूर्वेला सुमारे दोन हजार लढाऊ विमाने तैनात केली. यानंतर पाकिस्तानी लष्कराने दोन्ही आघाड्यांवर जवळपास 2800 आणि 30 लढाऊ विमाने तैनात केली. भारतीय हवाई दलाने युद्ध संपेपर्यंत पाकिस्तानमधील हवाई तळांवर प्रत्युत्तर देणे सुरूच ठेवले.
  4. भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडने 4-5 डिसेंबरच्या मध्यरात्री ट्रायडंट या सांकेतिक नावाने कराची बंदरावर हल्ला केला. पाकिस्तानने पश्चिम आघाडीवर आपले सैन्य तैनात केले होते. भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देत अनेक हजार किलोमीटरचा पाकिस्तानी भूभाग ताब्यात घेतला.
  5. या युद्धात पाकिस्तानचे सुमारे आठ हजार सैनिक मारले गेले, तर २५ हजार सैनिक जखमी झाले. त्याचवेळी भारताचे तीन हजार जवान शहीद झाले तर १२ हजार सैनिक जखमी झाले.
  6. पूर्व पाकिस्तानातील मुक्तिवाहिनी गटाने पाकिस्तानी सैन्याविरुद्ध लढण्यासाठी भारतीय सैन्याची बाजू घेतली. त्यांनी भारतीय लष्कराकडून शस्त्रास्त्रे आणि प्रशिक्षण घेतले. सोव्हिएत युनियननेही भारताला युद्धात साथ दिली.
  7. दुसरीकडे, रिचर्ड निक्सनच्या अमेरिकन सरकारने पाकिस्तानला आर्थिक आणि भौतिक मदत केली. युद्धाच्या शेवटी जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 93 हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्याला शरणागती पत्करली.

ABOUT THE AUTHOR

...view details