विजय पांडुरंग भटकरविजय पांडुरंग भटकर यांनी भारतात पहिला संगणकाचा अविष्कार केला होता. भारतीय संगणक शास्त्रज्ञ असून त्यांच्या प्रगल्भ बुद्धीमत्तेमुळे त्यांना भारतीय संगणकाचे गुरू माणले Vijay Bhatkar First Indian Computer Inventor जाते. विजय भटकर यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४६ मध्ये झाला. भटकर यांचे मूळ गाव म्हणजे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा. ते अडीचशे तीनशे लोकवस्तीचे गाव आहे.
संगणाकाची उत्पत्ती - भटकरांनी १९९३मध्ये परम-८०० तर १९९८मध्ये परम-१००० हे संगणक Vijay Bhatkar Computer Scientist बनवले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा संगणक प्रति सेकंद एक अब्ज गणिते करू शकत होता. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडत होता. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे.
साक्षरतेचा आकडा वाढवण्यासाठी प्रयत्न -त्यांनी भारतातील सर्व वापरल्या जाणाऱ्या भाषा संगणकांवर आणल्या. त्यामुळे साक्षरच काय पण निरक्षरही संगणक वापरू लागला होता. त्यांनी पुण्यातील सी-डॅकमध्ये प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. त्यामुळे भारतातील मुले आज भारतात नव्हे तर जगात नाव उज्जवल करत आहेत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्तर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. त्यांनी एसएमएससाठी भारतीय भाषांची प्रणाली विकसित केली. शाळेपर्यंत न पोचणाऱ्या मुलांसाठी 'एज्युकेशन टू होम' (ईटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी १९९८-९९ मध्ये ईटीए संशोधन शाळा सुरू केली. त्यामुळे कदाचित भारत हा जगातील सर्वात मोठा संगणक साक्षर देश बनेल. ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना शिक्षण दिले. त्यांनी घरात येणाऱ्या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टीव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉडबँड प्रणाली विकसित केली. भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केल्या.