हैदराबाद :कर्नाटकमधील विदुरश्वता येथे तिरंगा ध्वज सत्याग्रहादरम्यान 25 एप्रिल 1938 रोजी इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात 32 स्वातंत्र्य सैनिक शहीद झाले होते. जालियानवाला बाग घटनेशी साधर्म्य असल्याने याला कर्नाटकचे जालियानवाला बाग म्हणून ओळखले जाते. जालियानवाला बाग हत्याकांडानंतर 19 वर्षांनी विदुरश्वता इथे ही घटना घडली. दक्षिणेतील स्वातंत्र्य लढ्यात ही घटना अतिशय महत्वाची ठरली. या घटनेनंतर स्वातंत्र्य लढ्यातही अनेक बदल दिसून आले. स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना या घटनेविषयी जाणून घेऊया या खास रिपोर्टच्या माध्यमातून..
विदुरश्वतामध्ये आयोजित केला तिरंगा ध्वज सत्याग्रह
स्वातंत्र्याच्या आंदोलनादरम्यान काँग्रेसकडून प्रत्येक आयोजनादरम्यान तिरंगा ध्वज फडकवला जात होता. स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून या ध्वजाकडे बघितले जात होते. ब्रिटिशांनी बंदी घातल्यानंतरही शिवपूरमधील मंड्या येथे आयोजित तिरंगा ध्वज सत्याग्रह यशस्वी ठरला होता. अशाच पद्धतीने कर्नाटकातील विदुरश्वत्तामध्ये तिरंगा ध्वज सत्याग्रह आयोजित केल्यास अनेक लोक काँग्रेसकडे आकर्षित होतील असे काँग्रेस नेत्यांना तेव्हा वाटले होते. मात्र हा सत्याग्रह थोपविण्यासाठी पोलिसांनी एक महिना आधीच तयारी केलेली होती. 1938 च्या एप्रिल महन्यातील 25 तारखेला ध्वजारोहणासाठी एकत्र आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांवर पोलिसांनी लाठीमार सुरू केला. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 32 स्वातंत्र्य सैनिक शहीद झाले.
स्वातंत्र्य लढ्याला दिली नवी दिशा
या घटनेने स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा देण्याचे काम केले असे इतिहास अभ्यासक प्रा. गंगाधर यांचे म्हणणे आहे. "जुन्या मैसूर संस्थानमधील शिवपुरामध्ये प्रथमच ध्वज सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते. ब्रिटिशांनी यावर बंदी घातल्यानंतरही तो यशस्वी झाला होता. मैसूर संस्थानमधील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. या घटनेने स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा देण्याचे काम केले." असे मत प्राध्यापक गंगाधर यांनी व्यक्त केले आहे.
कर्नाटकचे जालियानवाला बाग