महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Video of Tiger and Bear Fight : अस्वलाने वाघाशी केले दोन हात, संघर्षात अस्वलाचा मृत्यू, पाहा व्हिडिओ

रामनगरमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधून वाघ आणि अस्वल यांच्या भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे. या भांडणामध्ये एका अस्वलाला आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Video of Tiger and Bear Fight
अस्वलाने वाघाशी केले दोन हात, संघर्षात अस्वलाचा मृत्यू, पाहा व्हिडिओ

By

Published : Mar 28, 2023, 3:49 PM IST

अस्वल आणि वाघाची लढाईचा व्हिडिओ

रामनगर (उत्तराखंड) :तुम्ही अनेकदा वन्य प्राण्यांची आपापसात भांडणे पाहिली असतील, ज्यामध्ये वन्य प्राणी एकमेकांना मारण्यासाठी आपसात भिडतात. लढाईत पराभूत झालेल्याला एकतर मैदान सोडण्यास भाग पाडले जाते किंवा जीवही गमावला जातो. असाच एक व्हिडिओ उत्तराखंडच्या जगप्रसिद्ध जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधून समोर आला आहे. येथे वाघ आणि अस्वल समोरासमोर आलेले दिसतात. या संघर्षात अस्वलाचा जीव गेला आहे.

वाघ आणि अस्वलचे भांडण : जगप्रसिद्ध जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये वन्यजीवांचे अनेक दुर्मिळ व्हिडिओ समोर येत असतात. यावेळी उद्यानाच्या झेला टुरिस्ट झोनमधून असाच एक अनोखा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये वाघ आणि अस्वल एकमेकांशी भांडत आहेत. पर्यटकांसोबतच उद्यानाच्या आत गेलेल्या टूरिस्ट गाइडने ही झुंज आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. लढाईत वाघाशी लढताना त्या अस्वलाचा मृत्यू झाला आहे.

संघर्षात अस्वलाचा मृत्यू :या व्हिडिओवर टूरिस्ट गाइड संजय छिमवाल सांगतात की, कॉर्बेटच्या ढेला झोनमधील कॉर्बेट पार्कमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचे दृश्य चित्रित करण्यात आले आहे. जेव्हा आमचे काही ड्रायव्हर आणि टूरिस्ट गाइड पर्यटकांना झेला पर्यटन झोनमध्ये सफारीसाठी घेऊन गेले, तेव्हा प्रथमच कॉर्बेट पार्कमध्ये वाघ आणि अस्वलाची लढत पाहायला मिळाली. पर्यटकांनी आवाज करूनही दोघांमधील भांडण थांबले नाही.

कॉर्बेट पार्कच्या जंगलातून असे व्हिडिओ पाहणे सामान्य :या घटनेवर कॉर्बेट पार्कचे संचालक डॉ. धीरज पांडे यांनी सांगितले की, अस्वल आणि वाघाच्या भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे. या भांडणामध्ये अस्वलाचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितले की, कॉर्बेट पार्कच्या जंगलातून असे व्हिडिओ पाहणे सामान्य आहे. मात्र पर्यटन क्षेत्रात ही घटना घडल्याने ती चांगलीच चर्चेत आली आहे. धीरज पांडे यांनी आवर्जून सांगितले की, वाघ आणि इतर प्राणी समोरासमोर येतात ही एक सामान्य घटना आहे. असे संघर्ष जंगलात होतच असतात. हा निसर्गाचा नियम आहे. अशा घटना पर्यटकांसाठी आयुष्यभराची संधी असून हा एक वेगळाच अनुभव असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा :Pune News: जगातील सर्वात मोठा निर्यातदार म्हणून अमेरिकेची जागा घेण्याचे चीनचे उद्दिष्ट- लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे

ABOUT THE AUTHOR

...view details