कानपूर (उत्तरप्रदेश) -शहरात झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही नागरिक हे एका पित्याला तिच्या 8 ते 9 वर्षीय मुलीसमोर मारहाण करताना दिसत आहेत. ती मुलगी मारहाण करणाऱ्या नागरिकांना आपल्या पित्याला सोडण्याची सतत याचना करत आहे. मात्र, मारहाण करणाऱ्या नागरिकांना त्या चिमुकलीच्या याचनेचा काहीही फरक पडलेला दिसत नाही आहे.
समाजकंटांची मुलीच्यासमोर पित्याला मारहाण जय श्री राम जयघोष करण्यास बळजबरी -
व्हिडिओमध्ये काहीजण पीडित नागरिकाला जय श्री राम असा जयघोष करण्यास बळजबरी करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओ कानपूर जिल्ह्यातील बर्रा पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे असे सांगितले जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
अज्ञात नागरिकांच्या विरोधात गुन्हा नोंद -
कानपूर जिल्ह्यातील बर्रा पोलीस ठाणे क्षेत्रातील रामगोपाल चौक परिसरातील वसाहतीतील हा व्हिडिओसमोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक हे एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. या पीडित नागरिकाच्या तक्रारीवरून अज्ञात नागरिकांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास चालू आहे, असे डीसीपी रवीना त्यागी यांनी सांगितले आहे.
काय आहे नेमके प्रकरण -
मिळालेल्या माहितीवरुन, हा प्रकार धर्मांतराशी जोडलेला आहे. बर्रा पोलीस ठाणे परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेला धर्म बदलण्यासाठी दबाव आणल्या जात होता. पीडित महिलेने असा आरोप केला आहे की, बर्रा ठाणे परिसरातील सलमान आणि सद्दाम त्यांचा धर्म बदलण्यासाठी दबाव टाकत होते. सलमान आणि सद्दाम यांनी धर्म बदलण्यासाठी तिला 20 हजार रूपये देण्यासाठीही तयार होते. जेव्हा महिलेने असे करण्यास नकार दिला त्यावेळी त्यांनी महिलेला व त्यांच्या 2 मुलींना परेशान करण्यास सुरुवात केली. याबाबत तिने बर्रा पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. त्यांनतर ती पीडित महिला ही बजरंग दलाच्या नागरिकांना भेटली होती. असा आरोप आहे की बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या युवकांचा मारहाण करून त्यांची धिंड काढली होती. यावर स्थानिकांनी सांगितले की, बर्रा ठाणे परिसरातील कुरैशा बेगम आणि रानी या दोन शेजाऱ्याच्या दरवाज्यावर मोटरसायकल घातल्यावरून वाद झाला होता. याला धार्मिक रुप दिल्या जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये मारहाण करत असलेले लोक हे कुरैशा बेगमच्या मुलांना धरण्यासाठी जात होते. मात्र कुरैशा बेगमचे मुले घरी नव्हते. मात्र, त्यांना तीचा देवर हा तिथे भेटला आणि त्यांनी त्याला मारहाण केली, असे सांगितले आहे.