कोलकाता (पश्चिम बंगाल) : रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे उपाध्यक्ष स्वामी प्रभानंद यांचे शनिवारी कोलकाता येथील रुग्णालयात निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. रामकृष्ण मिशनने एका निवेदनात म्हटले आहे की, स्वामी प्रभानंद हे गेल्या सहा महिन्यांपासून वयाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. निवेदनात म्हटले आहे की, आम्हांस अत्यंत दु:ख होत आहे की, रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशनचे उपाध्यक्ष आदरणीय स्वामी प्रभानंदजी महाराज यांचे शनिवारी सायंकाळी 6.50 वाजता सेवा प्रतिष्ठान, कोलकाता येथे निधन झाले.
कठीण काळात त्यांच्या भक्तांना बळ मिळो : निवेदनानुसार, स्वामी प्रभानंद यांचे पार्थिव रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत बेलूर मठात ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून भाविक आणि भक्तांना दिवंगत आत्म्याला अंतिम श्रद्धांजली अर्पण करता येईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वामी प्रभानंद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. स्वामी प्रभानंदांचे जीवन आणि शिकवण पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. या कठीण काळात त्यांच्या भक्तांना बळ मिळो. स्वामी प्रभानंद यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया रात्री ९ वाजता सुरू होईल, असे मिशनने म्हटले आहे.